महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या घटना समितीने तयार केलेल्या घटनेत काही सूचित बदल करून ती घटना योग्य तऱ्हेने धर्मदाय आयुक्तांकडे सादर करून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू” असे शुक्रवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या विशेष सभेत संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांनी जाहीर केले.
दादर, शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व.शंकरराव (बुवा) साळवी सभागृहात झालेल्या या सभेत घटना दुरुस्ती हा कळीचा मुद्दा होता.
यापूर्वी घटना समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेला अहवाल मागील सभेत मंजूर करण्यात आला होता.
कालानुरूप यात कोणास काही बदल किंवा एकादा नवीन मुद्दा सुचवायचा असल्यास त्यांनी तो लेखी स्वरूपात दि.०५जुलै २०१८ पर्यंत कचेरीत सादर करावा.
योग्य सूचनेचा निश्र्चितच आदर केला जाईल. असे त्यांनी सभेला आव्हान केले.
यंदाचा कबड्डी दिन हा परभणी येथे परभणी जिल्हा कबड्डी असो.च्या वतीने घेण्यात येईल. या सभेत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
यापुढे होणाऱ्या महिला – कुमारी व किशोरी गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाबरोबर प्रशिक्षक व व्यवस्थापिका म्हणून महिलांचीच नियुक्ती करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
–कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
–संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने