हलद्वानी- महाराष्ट्राच्या ट्रायथलॉन संघाने अखेरच्या दिवशी ड्यूयोथलॉन प्रकारात एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकून 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा षटकार झळकावित सर्वसाधारण विजेपदावर मोहोर उमटवली.
वैयक्तिक ड्यूयोथलॉनमध्ये (2.5 किलो मिटर धावणे, 20 किलो मिटर सायकलिंग व पुन्हा 2.5 किलो मिटर धावणे) डॉली पाटीलने 57.53 मिनिटात शर्यत पूर्ण करून रुपेरी यश मिळविले. या शर्यतीत मानसी मोहितेने 59.56 मिनिटात शर्यत पूर्ण करून कांस्य पदकावर मोहोर उमटवली.
ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राने 6 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाही गवसणी घातली. उद्घाटनापूर्वी 2 सुवर्ण पदके जिंकून महाराष्ट्राच्या ट्रायथलॉन संघाने सारे लक्ष वेधून घेतले होते. स्पर्धेत 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकून स्पर्धेत अजिंक्यपदाचा ठसा उमटविला.
महत्त्वाच्या बातम्या-
जलतरणामध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य
IND vs ENG: पुणे टी20 सामन्यासाठी MCA स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट–