वडोदरा। महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडू समृद्धी कुलकर्णी व विधी शाह यांनी युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षाखालील गटाच्या उपांत्यफेरीत धडक मारली. ही स्पर्धा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) यांच्या मान्यतेखाली वडोदराच्या समा इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम येथे सुरु आहे.
समृद्धीने गुजरातच्या कविशा पारेखवर उपांत्यपुर्व फेरीत 11-7, 11-5, 11-5 असा विजय मिळवला.विधीने तमिळनाडूच्या जे मारिआ अँसीला 12-10, 11-4, 14-16, 4-11, 11-9 असे नमविले. त्यापुर्वी, गुजरातच्या नंदीश हलानीने राष्ट्रीय चॅम्पियन व भारताच्या दुस-या मानांकित दिल्लीच्या आदर्श छेत्रीला 3-2 अशा फरकाने मुलांच्या 17 वर्षाखालील गटात नमविले. उपांत्यपुर्व फेरीत नंदिशला सीआयएससीईच्या राजवीर शाहकडून 11-5, 11-8, 9-11, 11-8 असे पराभूत व्हावे लागले.
दिल्लीच्या पायस जैनने उपांत्यफेरीत धडक मारली. त्याने उपांत्यपुर्व फेरीत गुजरातच्या चित्रांक्ष भटवर 13-11, 9-11, 11-4, 8-11, 11-8 असा विजय मिळवला. युटीटी व टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा संघाने संयुक्तपणे त्याचे आयोजन केले आहे. त्याला स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ गुजरात, गुजरात राज्य टेबल टेनिस असोसिएशन व वडोदरा महानगर सेवा सदन यांचा पाठींबा आहे.
निकाल (एकेरी उपांत्यपुर्व फेरी)
– 17 वर्षाखालील मुली :
वंशिका भार्गवा ( दिल्ली) वि.वि. तमन्ना गुलशन (हरयाणा) 13-11, 3-11, 7-11, 11-4, 14-12,
आफरीन मुराद (गुजरात) वि.वि. तृप्ती पुरोहित (कर्नाटक) 8-11, 11-3, 9-11, 11-9, 11-5,
डी के वेदालक्ष्मी (तमिळनाडू) वि.वि. लक्षिता नारंग (दिल्ली) 11-6, 5-11, 11-8, 11-6,
मुनमुन कुंडु (पश्चिम बंगाल) वि.वि. नमना जयस्वाल (गुजरात) 11-2, 12-14, 11-5, 11-7
– मुले 17 वर्षाखालील गट :
यशांश मलिक (दिल्ली) वि.वि. सम्वक कशवाद (आयबीएसएसओ) 13-11, 7-11, 11-3, 11-7,
अनिकेत चौधरी ( पश्चिम बंगाल) वि.वि. खेलेंद्रजित येंगखोम (राजस्थान) 11-6, 11-6, 11-8,
राजवीर शाह (सीआयएससीई) वि.वि. नंदीश हलानी (गुजरात) 11-5, 11-8, 9-11, 11-8,
पायस जैन (दिल्ली) वि.वि. चित्रांक्ष भट्ट (गुजरात) 13-11, 9-11, 11-4, 8-11, 11-8
– 19 वर्षाखालील मुली :
तिशा कोहली (दिल्ली) वि.वि. अदीती सिन्हा 3-11, 6-11, 12-10, 11-9, 11-6,
तेजल कांबळे वि.वि. अंकिता पटवर्धन 11-6, 13-11, 9-11, 9-11, 11-7,
समृद्धी कुलकर्णी (महाराष्ट्र) वि.वि.कविशा पारेख (गुजरात) 11-7, 11-5, 11-5,
विधी शाह (महाराष्ट्र) वि.वि. जे मारिआ अँसी (तमिळनाडू) 12-10, 11-4, 14-16, 4-11, 11-9
-मुले 19 वर्षाखालील :
श्रेवान्स गोयल (दिल्ली) वि.वि. अग्निव गोहैन ( आसाम) 11-5, 12-10, 9-11, 11-8,
अबीर रॉय (पश्चिम बंगाल) वि.वि. वंश सिंघल (सीबीएसई) 11-2, 11-7, 11-5,
आकाश पाल (पश्चिम बंगाल) वि.वि. विदीत देसाई (गुजरात) 11-6, 11-6, 11-9,
वेस्ले डो रोसारिओ (हरयाणा) वि.वि.तमाल बल्लाव (पश्चिम बंगाल) 11-7, 5-11, 11-6, 8-11, 11-6