अल्मोरा: आर्टिस्टीक योगासनाच्या एकेरीत महाराष्ट्राच्या रुपेश संगे याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. खरे तर प्रशिक्षकांनी हरकत (प्रोटेस्ट) घेत सुवर्णपदकाचा दावा केला होता. मात्र, पंचांच्या अंतिम निर्णयानंतर रूपेशला रूपेरी यशावरच समाधान मानावे लागले. उत्तरप्रदेशच्या प्रवीण पाठकने 118.91 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. रौप्यपदक विजेत्या रुपेशला पंचांनी 117.88 गुण दिले. छ्त्तीसगडचा प्रकाश साहू 117.25 गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
जलतरणात प्रतीक्षा डांगी, मिहिर आंब्रे यांना रौप्य! ऋषभ दासला, ऋतुजा राजधन्या यांना कांस्य
महाराष्ट्राचा पदकांचा सुवर्णमहोत्सव, पदक तक्यात दुसर्या स्थानी झेप
अभिषेक शर्माने लावली इंग्लंडची वाट; तुफानी शतक ठोकून रचला विक्रम