---Advertisement---

लसिथ मलिंगा ठरणार का १५० बळी घेणारा आयपीएलचा पहिला खेळाडू..??

---Advertisement---

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १० व्या मोसमात अनेक विक्रम खेळाडूंच्या नावे होत आहेत. मग ते १०० सामने खेळणं असो वा ४००० धावा पूर्ण करणं असो.

या विक्रमात लवकरच एक नवीन भर पडू शकते. सध्या सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावे आहे ( १४९ बळी ), म्हणजे पुढच्या मुंबई इंडियंन्सच्या सामन्यात मलिंगाला १५० बळींचा टप्पा गाठण्याची संधी आहे.

असे जर मलिंगा करू शकला तर तो आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा एकमेव खेळाडू होईल. आयपीएल सुरु झाल्यापासून मलिंगाचा बोलबाला हा कायम राहिला आहे आणि गेली दहा वर्ष सातत्याने बळी घेण्याचे कामदेखील तो चोख करत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment