---Advertisement---

राहुल द्रविड़ यांनी फक्त वैभव सूर्यवंशीचं नाही, तर अनेक खेळाडूंचंही नशीब बदललं

Rahul-Dravid
---Advertisement---

राहुल द्रविड हे त्यांच्या शानदार फलंदाजी करिअरसाठी मशहूर आहेत. क्रिकेटच्या जगात त्यांना ‘द वॉल’ नावाने ओळखले जाते. पण फलंदाजी शिवाय द्रविड यांनी प्रशिक्षकाच्या रूपात भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्यांनी प्रशिक्षक म्हणून क्रिकेटच्या दुनियेत युवा टॅलेंटला निवडून-निवडून दुनियेसमोर आणले आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघ, राजस्थान रॉयल्स व भारतीय अनुभवी संघामध्ये राहुल द्रविड यांनी अनेक युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांचे भविष्य उज्वल केले आहे.

सोमवार 28 एप्रिल रोजी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी फक्त 35 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्या या यशामध्ये राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 करोड रुपयांना खरेदी केले होते. हा निर्णय राहुल यांच्या सल्ल्यानुसार झाला होता. द्रविड यांनी वैभवला ट्रायल्समध्ये पाहिले होते आणि तिथूनच त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला.

यशस्वी जयस्वाल
यशस्वी जयस्वालची कहाणी कोणत्याही प्रेरणेपेक्षा कमी नाही. मुंबईच्या रस्त्यावर पाणीपुरी विकण्यापासून भारतीय कसोटी संघाचा हिस्सा बनण्यापर्यंत यशस्वी जयस्वालची कहाणी द्रविड यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. 2018 मध्ये द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली अंडर 19 विश्वकप खेळणाऱ्या भारतीय संघामध्ये यशस्वी सामील होता. जिथे त्याने शानदार प्रदर्शन केले. द्रविड यांनी त्याच्या मेहनतीला ओळखले आणि सलग त्याला संधी दिली. राजस्थान रॉयल्समध्ये सुद्धा द्रविड यांनी यशस्वीला पाठिंबा दिला. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली.

ईशान किशन
ईशान किशनच्या प्रतिभेला सुद्धा द्रविड यांनी योग्य वेळेवर ओळखले होते. अंडर 19 वर्ल्डकप 2016 मध्ये द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली ईशान किशनने कर्णधार पद आणि त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

शुबमन गिल
2018 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये शुबममने द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली शानदार प्रदर्शन केले आणि स्पर्धेत तो सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला. राहुल यांनी त्याच्या स्टाईलला ओळखले आणि त्याला मोठ्या- मोठ्या संधीसाठी तयार केले. आज शुबमन कसोटी, वनडे आणि टी20 मध्ये भारतासाठी मोठे-मोठे स्कोर बनवत आहे.

रिषभ पंत
रिषभ पंतच्या फलंदाजीला जगाने पाहिले आहे. त्याचा या खेळीमध्ये राहुल द्रविड यांचा मोठा वाटा आहे. अंडर19 लेवल वर द्रविड यांनी रिषभच्या आक्रमक शैलीला ओळखले आणि त्याला एक योग्य मार्ग दाखवला. जेव्हा रिषभने भारतीय संघात स्थान मिळवले तेव्हा द्रविड यांनी क्रिकेट ॲकॅडमीमध्ये त्याच्या फिटनेस वर काम केले. जेव्हा तो दुखापती मधून जात होता, तेव्हाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खूप खेळाडू नावारूपास आले आहेत. ज्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, आकाश दीप आणि आवेश खान इत्यादींचा समावेश आहे. राहुल द्रविड यांनी फक्त खेळाडूंना संधी दिली नाही तर त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास आणि त्यांना ते मार्गदर्शन देखील दिले, ज्यामुळे या खेळाडूंचे नशीब बदलले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---