मुंबई। मुंबई इंडियन्सच्या ‘MI Junior’च्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली. दुसऱ्या पर्वाचा पहिला दिवस गाजवला तो चेंबूरच्या अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअर संघाच्या हुणार मॅट्रेजानं. त्यानं फोर्टच्या सेंट झेव्हिर हाय स्कूल संघाविरुद्ध 89 चेंडूंत 107 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअर संघानं दणदणीत विजयाची नोंद केली. हुणारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.
दरम्यान चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले. रिझवी स्प्रिंगफिल्डच्या 14 वर्षीय कर्णधार रोशन कनोजियानंही तुफानी फटकेबाजी करताना 63 चेंडूंत 99 धावा केल्या. त्याला हर्ष अघावनं 67 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. हर्षनं गोलंदाजीतही कमाल दाखवताना 3 विकेट्स घेतल्या आणि म्हणून त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
मुंबई इंडियन्स ‘MI Junior’च्या कक्षा रुंदावल्या, आता पुणे व नागपूरातही रंगणार चुरस –
मुंबई इंडियन्सच्या ‘MI Junior’ या क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमाला आजपासून सुरुवात झाली. 14 वर्षांखालील मुले आणि 16 वर्षांखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित या स्पर्धेत सोमवारी भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि पद्म श्री पुरस्कार जाहीरने खेळाडूंशी संवाद साधला. यंदा या स्पर्धेच्या कक्षा रुंदावल्या असून मुंबईसह पुणे आणि नागपूरातही ( 16 वर्षांखालील मुले) ‘MI Junior’चे सामने खेळवण्यात येणार आहेत.
2019मध्ये ‘MI Junior’ची सुरुवात झाली. पहिल्या मोसमात 14 वर्षांखाली मुले आणि 16 वर्षांखालील मुली यांच्यांसाठी सामने खेळवण्यात आले होते. यंदा त्यात 16 वर्षांखालील मुलांच्या गटाचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई लेगला सोमवारपासून सुरुवात झाली, तर पुणे आणि नागपूर लेग अनुक्रमे 16 व 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या लेगमधील विजेता संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरेल आणि त्यानंतर 16 मार्चला मुंबईत अंतिम सामना खेळवण्यात येईल.
या स्पर्धेत 200 शाळांमधील संघांमध्ये 375 सामने होणार आहेत. ‘MI Junior’च्या पहिल्या मोसमात रिझवी स्प्रिंगफिल्ड हाय स्कूल आणि शारदाश्रम विद्यामंदीर इंग्लिश स्कूल यांनी अनुक्रेमे 14 वर्षांखालील मुले व 16 वर्षांखालील मुली गटाचे जेतेपद नावावर केले होते. विजेत्या संघांतील खेळाडूंना मुंबई इंडियन्सच्या वानखेडेवर स्टेडियमवर आयपीएल सामना पाहण्याची संधी मिळाली होती.
संक्षिप्त धावफलक
अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअर संघ – 32 षटकांत 8 बाद 203 ( हुणार मॅट्रेजा 107, आर्यन प्रभाकर 21) वि. वि. सेंट झेव्हियर हाय स्कूल ( फोर्ट) – 32 षटकांत 8 बाद 174 ; 29 धावांनी विजय, सामनावीर – हुणार मॅट्रेजा
रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल ( खार) – 40 षटकांत 5 बाद 363 ( रोशन कनोजिया 99, हर्ष अघाव 67) वि. वि. आरबीके ग्लोबल स्कूल ( भायंदर) – 24 षटकांत सर्वबाद 74; 287 धावांनी विजय, सामनावीर – हर्ष अघाव
आय.ई.एस. व्ही. एन. सुळे गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल ( दादर)- 7.1 षटकांत 1 बाद 31 ( रुद्रा सुकाळे 20*, दर्श मुरकुटे 4*) वि. वि. आय. ई. एस. नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) – 12.2 षटकांत सर्वबाद 30; 9 विकेट्सने विजयी, सामनावीर – इशान धाडीगावकर ( 4 विकेट्स)
धिरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ( बीकेसी) – 15 षटकांत 2 बाद 80 ( वीर कपूर 34*, अमर्त्य राजे 20*) वि. वि. फातिमा हायस्कूल ( घाटकोपर) – 26.4 षटकांत सर्वबाद 77; 8 विकेट्सने विजयी, सामनावीर – वीर कपूर ( 34 धावा व 3 विकेट्स)
अंजूमन इस्लाम अल्लाना इंग्लिश हायस्कूल ( सीएसएमटी) – 40 षटकांत 7 बाद 271 ( सुजीत दळवी 90, अभिग्यान कुंदू 31) वि. वि. डॉन बॉस्को इंटनॅशनल ( माटुंगा ) – 17 षटकांत सर्वबाद 65 ( मन भानुषाली 4 विकेट्स) ; 206 धावांनी विजयी, सामनावीर – सुजीत दळवी
डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) – 37 षटकांत 5 बाद 413 धावा ( तन्मय इंगळे 80, आयुष सावंत 76) वि. वि. श्री अमुलख अमिचंद बिमजी विद्यालय – 13.3 षटकांत 9 बाद 19 धावा; 395 धावांनी विजयी, सामनावीर – तन्मन इंगळे
शेठ विरचंद देवजी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल ( घाटकोपर) – 33.4 षटकांत सर्वबाद 189 ( आर्यन माळकर 27, नील मेहता 26) वि. वि. होली क्रॉस हायस्कूल ( कुर्ला) – सर्वबाद 166; 23 धावांनी विजयी, सामनावीर – जय शाह ( 5 विकेट्स)