भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लॅब्यूशेनने शानदार शतक ठोकले आहे. त्याच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 87 षटकात 5 बाद 274 धावा केल्या आहेत. लॅब्यूशेनने या शतकासह खास विक्रमही केला आहे.
लॅब्यूशेनने 204 चेंडूंचा सामना करत 108 धावांची शानदार शतकी खेळी केली. या खेळीत 9 चौकार देखील लगावले. या शतकासोबतच लॅब्यूशेन आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. लॅब्यूशेनने या यादीत बेन स्टोक्स, बाबर आजम व स्टीव स्मिथला पछाडले आहे.
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये लबुशानेचे हे पाचवे शतक आहे. बेन स्टोक्स, बाबर आजम व स्टीव स्मिथ यांच्या नावावर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी चार शतके आहेत. तर भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, केन विल्यमसन, डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी तीन शतके आहेत.
लॅब्यूशेनने ही शतकी खेळी करताना स्टीव्ह स्मिथसह तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची तर मॅथ्यू वेडसह चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. याबरोबरच हे फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार टीम पेनने युवा फलंदाज कॅमेरॉन ग्रीनसह डाव सांभाळला. हे दोघेही पहिल्या दिवसाखेर नाबाद आहेत. पेन 38 धावांवर तर ग्रीन 28 धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा येरे माझ्या मागल्या! सिडनी पाठोपाठ ब्रिस्बेनमध्येही सिराजबद्दल प्रक्षेकांमधून ऐकू आले अपशब्द
डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्माने घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मार्नस लॅब्यूशेनने भारताविरुद्ध शतकी खेळी करत डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे, केला ‘हा’ खास रेकॉर्ड