पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ १९७ धावांनी आघाडीवर आहे. या सामन्यामधील मार्नस लॅब्यूशाने आणि शुबमन गिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला होता. या व्हिडिओत लॅब्यूशाने आपल्या संवादाने गिलला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. आता लॅब्यूशानेने यामागील कारण सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज लॅब्यूशाने याने मैत्रीच्या भावनेने गिलसोबत संवाद साधला होता. त्याने बोलताना गिलला वाईट वाटावे असे वक्तव्य केले नव्हते. केवळ गिलचे लक्ष विचलित करावे आणि लवकर संघाला त्याची विकेट मिळावी, या उद्देशाने लॅब्यूशाने त्याच्याशी बोलला असल्याचे त्याने सांगितले आहे.
लॅब्यूशाने म्हणाला की, “मी त्याला खूप साधे प्रश्न विचारले होते. तरीही त्याने मला उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे मी खूप निराश झालो आहे. मी फक्त त्यावेळेचा आनंद लुटत होतो. मी गिलच्या मनाला ठेच पोहोचावी असे काहीही बोललो नाही. मी त्याला तुझा आवडता क्रिकेटपटू कोण आहे?, हा साधारण प्रश्न विचारला होता. पण त्यावेळी त्याने मला उत्तर दिले नाही. असे असले तरी, तुम्ही काळजी करु नका. मी त्याच्याकडून माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळवूनच दाखवेन.”
लॅब्यूशानेचा गिलला डिवचण्याचा प्रयत्न
भारत-ऑस्ट्रेलिया संघात सिडनीमध्ये चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा किस्सा घडला होता. यावेळी गिल पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू लॅब्यूशाने त्याच्याजवळ आला आणि त्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. लॅब्यूशाने गिलला विचारले की, “तुझा आवडता खेळाडू कोण आहे?”. यावर गिल उत्तर देत म्हणाला की, “मी या प्रश्नाचे उत्तर तुला नंतर देईल.” अर्थातच सामना संपल्यानंतर तुला याला उत्तर मिळेल, असे गिलने लॅब्यूशानेला म्हटले.
.@marnus3cricket was enjoying being back under the helmet for the Aussies! #AUSvIND pic.twitter.com/GaCWPkTthl
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
Marnus just wants to know who Gill's favourite player is! 😂 #AUSvIND pic.twitter.com/VvW7MixbQR
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
त्यानंतर लॅब्यूशाने म्हणाला की, “सचिन? तू विराटला मानतो का?”. दरम्यान त्यांच्यातील संभाषणाचा आवाज स्टंप माईक्समध्ये कैद झाला.
पहिल्या डावात गिलचे अर्धशतक
भारताचा युवा फलंदाज गिलने या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. त्याने रोहितसोबत मिळून ७० धावांची भागिदारी साकारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुडने रोहितला २६ धावांवर बाद करत त्यांची भागिदारी मोडली होती. त्यानंतर गिलने पुढे फलंदाजी करताना १०१ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने ८ चौकार ठोकले होते. पॅट कमिन्स याने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही