---Advertisement---

सीपीएलमध्ये गप्टिलचा झंझावात! षटकारांची बरसात करत ठोकले शतक

---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2023) च्या 13 व्या सामन्यात ट्रिनबॅगो नाइट रायडर्सने बार्बाडोस रॉयल्सचा 133 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या.  प्रत्युत्तरात बार्बाडोस रॉयल्सचा संघ 12.1 षटकात अवघ्या 61 धावांवर गारद झाला. नाईट रायडर्सचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

बार्बाडोस रॉयल्सचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र, त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या नाइट रायडर्ससाठी गप्टिलने तुफानी फलंदाजी केली.  गप्टिलने केवळ 58 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 100 धावांची नाबाद खेळी केली. गप्टिल हा मागील बऱ्याच काळापासून न्यूझीलंड राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्याच्या जागी सध्या न्यूझीलंड संघात सलामीवीर म्हणून फिन ऍलन व डेवॉन कॉनवे सलामीची जबाबदारी सांभाळतात.

कर्णधार कायरन पोलार्डने त्याला मधल्या फळीत चांगली साथ दिली आणि 32 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. यामुळेच संघाला 194 अशी मोठी धावसंख्या रचण्यात यश आले.

या पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्सचा संघ 12.1 षटकात केवळ 61 धावांवरच मर्यादित राहिला. संघाच्या दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही. बार्बाडोस संघासाठी अष्टपैलू जेसन होल्डरने सर्वाधिक 14 धावा केल्या. बार्बाडोस संघाचे इतर कोणतेही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात 13 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय वकार सलामखेलनेही 14 धावांत 4 बळी घेतले. बार्बाडोस रॉयल्सचा सीपीएल इतिहासातील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा पराभव आहे.

(Martin Guptil Hits Century In CPL For Trinbago Knight Riders)

महत्वाच्या बातम्या- 
तुफानी अर्धशतकाचे टीम डेव्हिडला बक्षिस! ऑस्ट्रेलिया निवडसमितीचा मोठा निर्णय   
दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंबाबत श्रीलंकन कर्णधाराचे वक्तव्य, म्हणाला आम्हच्याकडे युव खेळाडू…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---