कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरच्या दरम्यान घेण्याच्या तयारीत आहेत. तथापि, सप्टेंबरमध्ये उर्वरित आयपीएल सामने आयोजित करणे बीसीसीआयला सोपे जाणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात इंग्लिश खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. याचदरम्यान आता बातमी समोर येत आहे की, न्यूझीलंडचे खेळाडूदेखील आयपीएल 2021 मध्ये खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.
आगामी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड संघ युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन, मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाड ट्रेंट बोल्ट यांच्यासह अनेक कीवी खेळाडू आयपीएलमध्ये न दिसण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडला सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
ही मालिका फ्यूचर टूर प्रोग्रामचा भाग आहे, जी रद्द किंवा पुढे ढकलता येणार नाही. म्हणजेच आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये झाले तर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू त्यात न दिसण्याचीच शक्यता अधिक आहे.
हे खेळाडू आयपीएल 2021 मध्ये कदाचित दिसणार नाहीत
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन, मुंबई इंडियन्सचा अॅडम मिल्ने व ट्रेंट बोल्ट, चेन्नई सुपर किंग्जचा मिशेल सॅंटेनर, कोलकाता नाइट रायडर्सचा लॉकी फर्ग्युसन आणि टिम सिफर्ट, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिन ऍलन आणि काईल जेमिसन
या कारणामुळे इंग्लंड खेळाडूही राहणार अनुपस्थित
काहीशी अशीच बाब इंग्लंडच्या क्रिकेटपटूंबद्दल आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघाला बांगलादेशविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील खेळाडूंव्यतिरिक्त बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे खेळाडू देखील आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात उपलब्ध होणार नाहीत, कारण बांगलादेश इंग्लंडचे यजमानपद भूषविणार आहे व त्याचदरम्यान अफगाणिस्तानला पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-अनुष्काच्या मोहिमेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद; पाच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा कोरोना मदतनिधी
विराट कोहली ‘या’ बाबतीत नेहमीच हरतो, शुबमन गिलने केला खुलासा
कुलदीपला येतेय एमएस धोनीची आठवण, म्हणाला, “माही भाईच्या मार्गदर्शनची कमी जाणवते, कारण…”