बुधवारी (दि. २३ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी पंजाब संघाकडून सलामीला फलंदाजी करण्यास आलेला कर्णधार मयंक अगरवालने शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने नादखुळा कारनामा आपल्या नावावर केला. (Mayank Agarwal Complete His First Fifty As A Captain Against Mumbai Indian In IPL 2022)
या सामन्यात पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) फलंदाजी करताना मयंकने (Mayank Agarwal) सलामीला येताच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने ३२ चेंडूत ५२ धावा करत अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३६ धावांचे योगदान दिले. यासह त्याने कर्णधार म्हणून आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले, तर त्याचे आयपीएल कारकीर्दीतील हे १२वे अर्धशतक होते. विशेष म्हणजे, मुंबईविरुद्धचा हा सामना त्याचा आयपीएलमधील १००वा डाव आहे.
A #CaptainPunjab knock ™️#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #MIvPBKS pic.twitter.com/bdrnqn58UT
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
हंगामातील पंजाब संघाची कामगिरी
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब संघाने या हंगामात ४ सामने खेळले आहेत. या ४ सामन्यांपैकी पंजाब संघाला २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर उर्वरित २ सामन्यात पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब संघाच्या गुणतालिकेतील स्थानाबद्दल बोलायचं झालं, तर ते या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
FIFTY for @mayankcricket 👏👏
This is his first of #TATAIPL 2022 and 12th overall.
Live – https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/4HsCmAvXNa
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मयंक अगरवालची आयपीएल कामगिरी
मयंक अगरवालच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर मयंकने आतापर्यंत १०५ सामने खेळताना २३.२२च्या सरासरीने २२२९ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने १२ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच, यामध्ये १ अर्धशतकाचाही समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर