भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन म्हणाले होते, की भारतीय संघ ही कसोटी मालिका 0-4 अशा मोठय़ा फरकाने पराभूत होईल. मात्र असे झाले नाही. त्यामुळे माइकल वॉन यांनी पलटी मारली आहे. त्याचबरोबर ते भारतीय संघाचे कौतुक करत आहेत. भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सुरुवातीला खराब स्थितीत होता. या सामन्यातील तिसर्या दिवशी भारतीय संघाने 186 धावा करताना 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र तळातील फलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताला 336 धावांटा टप्पा गाठून दिला.
भारतीय संघाने केलेल्या या शानदार कामगिरीला पाहून माइकल वॉन यांना राहावले नाही. त्यांनी भारतीय संघाचे कौतुक करण्यासाठी ट्विट केले. त्याचबरोबर माइकल वॉन यांनी लिहले,”याचे पूर्ण श्रेय भारतीय संघाला जाते. भारतीय संघाने ज्या प्रकारे भूमिका निभावली आहे. ती कमाल आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचे बरेच खेळाडू जखमी झाले आहेत. परंतु भारतीय संघातील राखीव खेळाडूंची ताकद काय हे त्यांनी दाखवून दिले. आता भारतीय संघाकडे खुप मजबूत खेळाडू आहेत. ”
Full credit to India … The character they have had to show on this tour has been remarkable … also the resilience with so many injuries … a team is only as good as its bench many say … Well India have a very strong bench of players now … #AUSvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 17, 2021
ठाकूर आणि सुंदर यांनी भारतीय संघाला पुनरागमन करून दिले
एक वेळ अशी होती, जेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 186 धावा करताना 6 विकेट्स गमावले होते. तेव्हा धावपट्टीवर वॉशिंग्टन आणि ठाकूर होते. दोघे ही आपल्या कसोटी कारकिर्दीतील अनुक्रमे पहिला आणि दुसरा सामना खेळत होते. त्यामुळे कोणी कल्पना ही केली नव्हती की भारत 250 पेक्षा जास्त धावा करेल. मात्र या दोघांनी ही कल्पना कल्पनाच ठेवत वास्तवात भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉशिंग्टन आणि ठाकूर सुंदर या दोघांनी अनुक्रमे 62 आणि 67 धावांची खेळी करून भारतीय संघाचे पुनरागमन केले. त्याचबरोबर या सामन्यातील भारताचे आव्हान अबाधित ठेवले. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावसंख्या उभारली.
ऑस्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्यांनी तिसरा दिवस अखेर 6 षटके खेळत बिनबाद 21 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे अनुक्रमे 20 आणि 1 धावावर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल
ब्रिस्बेन कसोटीतील वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ खेळीनंतरही वडील निराश, काय आहे यामागचं कारण