भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) राष्ट्रीय महासंघाला(एनएसएफ) ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यास सांगितले आहे.
यावर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ही २१वी राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली. यावेळी या स्पर्धेत भारतीय खेळाडू आणि अधिकारी यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई आयओएने केली आहे. त्यांनी ७३९८८ एवढी नुकसान भरपाईची रक्कम राष्ट्रकुल स्पर्धाच्या अधिकाऱ्याकडे भरली आहे.
आयओएचे अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी एनएसएफचे महासचिव राजीव मेहता यांच्याशी याबद्दल इ-मेल मार्फत विचारणा केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडू आणि अधिकारी यांनी राहण्याच्या जागेतील मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी हा दंड ठोठावला आहे.
यामध्ये बास्केटबॉल, हॉकी आणि अॅथलेटिक्स यांना मिळून ५९२६२ यामधील रक्कम भरायची आहे.
‘अशा प्रकारच्या घटना भारताच्या भुमिकेसाठी चांगल्या नाही. खेळाडूंना एशियम गेम्ससारख्या स्पर्धांमध्ये नीट वागावे लागेल’, असे बात्रांनी त्यांच्या मेलमध्ये लिहले होते.
‘तसेच त्यांनी खेळाडूंना नियमांचे योग्य असे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.’
बास्केटबॉल संघाला सर्वाधिक अशी २०४००, अॅथलेटिक्सला ११८३२, हॉकीला ७८५४, शूटिंग आणि वेटलिफ्टींगला ५१००, स्क्वॅशला ३८७६ आणि टेबल टेनिसला २५५० अशाप्रकारे संघाला नुकसान भरपाईची रक्कम द्यायची आहे.
तसेच रेफ्रिजरेटरचे १४७२६ रुपयांचे नुकसान झाले आहे.ती नुकसान भरपाई आयओएने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…
–कोहलीवर टीका करण्यापूर्वी तुझे संघातील स्थान पहा, इंग्लंडच्या गोलंदाजावर झहीर कडाडला!