---Advertisement---

मिचेल स्टार्कने शाकिब अल हसनचा जागतिक विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

---Advertisement---

बार्बाडोस कसोटीतील पहिल्या डावात 3 विकेट्स घेऊन मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) एक मोठी कामगिरी त्याच्या नावावर केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डाव्या हाताचा गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. या खास कामगिरीमध्ये त्याने दुसऱ्या कोणाला नाही तर माजी बांगलादेशी कर्णधार शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) मागे टाकले आहे.

ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) डाव्या हाताचा गोलंदाज म्हणून 712 विकेट्स घेतल्या होत्या. पण आता स्टार्कच्या 713 विकेट्स झाल्या आहेत. त्याच्या पुढे आता केवळ दुनियेतील दोनच गोलंदाज आहेत. हे दोन्ही खेळाडू माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रम (Vasim Akram) आणि माजी श्रीलंका वेगवान गोलंदाज चमिंडा वास (Chaminda Vaas) आहेत. अक्रमने त्याच्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डाव्या हाताचा गोलंदाज म्हणून 916 विकेट्स घेतल्या होत्या, तसेच वासने 761 विकेट्स घेतलेल्या आहेत.

या खास यादीमध्ये टीम इंडियाचा (Team India) माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जहीर खान (Jahir khan) आणि सध्याचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) सुद्धा नाव सामील आहे. जहीर खानने देशासाठी 379 डावांमध्ये 610 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जडेजाने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 359 सामन्यांच्या 419 डावांमध्ये 29.16 च्या सरासरीने 609 विकेट्स घेतलेल्या आहेत.

डाव्या हाताचे गोलंदाज ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत.

916 विकेट – वसीम अकरम
761 विकेट – चमिंडा वास
713 विकेट – मिचेल स्टार्क
712 विकेट – शाकिब अल हसन
705 विकेट – डेनियल विटोरी
611 विकेट – ट्रेंट बोल्ट
610 विकेट – जहीर खान
609 विकेट – रवींद्र जडेजा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---