श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने आपल्या भेदक गोलंदाजीने एक नवीन इतिहास निर्माण केला आहे.
सोमवारी (७ डिसेंबर) गाले ग्लेडिएटर्सकडून खेळताना आमिरने कोलंबो किंग्ज विरुद्ध केवळ २६ धावा देवून ५ फलंदाजांना बाद केले आहे. आमिर लंका प्रीमियर लीग मध्ये ५ विकेट मिळवणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ५ विकेट घेण्याची ही आमिरची दुसरी वेळ आहे.
एलपीएलच्या १४ व्या सामन्यात कोलंबो किंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आमिरच्या घातक गोलंदाजीमुळे कोलंबोला केवळ १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलंबो संघाकडून इंग्लंडच्या डॅनियल बेल ड्रमंडने सर्वाधिक ४४ धावा बनवल्या तसेच दिनेश चंदिमलने ३५ धावांची खेळी केली. गाले संघाकडून आमिरने ५, तर संदाकनने ३ बळी मिळवले.
कोलंबो संघाच्या धावांचा पाठलाग करताना गाले संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर ८ विकेट राखून विजय मिळवला. गाले संघाकडून अहसान अलीने सर्वाधिक ५६ धावा केल्या.
लंका प्रीमियर लीगचा अंतिम सामना १६ डिसेंबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?