भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची आजपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. विजयरथावर स्वार असलेले दोन्हीही संघ तगड्या अंतिम ११ जणांच्या पथाकसह मैदानावर उतरले आहेत. परंतु या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी ट्विटरद्वारे भारतीय संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत कैफ यांनी लिहिले आहे की, “दोन वर्षांपूर्वी कुलदीप कसोटीतील भारताचा पहिला पसंतीचा फिरकीपटू होता. परंतु सध्या त्याच संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रेरणा मिळवण्यासाठी त्याला फार दूर जाण्याची गरज नाही. त्याचे प्रेरणास्त्रोत त्याच्याजवळच आहे. आर अश्विन आणि रिषभ पंत यांनी आत्मविश्वासाने संघर्ष करत पुन्हा भारतीय संघातील आपले स्थान मिळवले आहे.”
Just two years ago, Kuldeep Yadav was touted as India's first choice spinner in Tests. Now, he's battling to stay afloat. But he needn't look too far for inspiration. Ashwin & Pant too fought back from periods of self doubt. Stay strong Kuldeep!
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 5, 2021
कुलदीपला संधी मिळण्याची होती दाट शक्यता
चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी सोईची असल्याने आर अश्विनसोबत कुलदीपला संधी मिळणे, जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात होते. याबरोबरच फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर केल्याने कुलदीपच्या पुनरागमनाच्या आशा अजून वाढल्या होत्या. परंतु त्याला संधी न देता ३१ वर्षीय फिरकीपटू शाहबाज नदीमची निवड करण्यात आली.
कुलदीपने खेळलेत अवघे ६ कसोटी सामने
चायनामन कुलदीपने मार्च २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर त्याने फक्त ६ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २४ विकेट्स घेतल्या आहेत. ५७ धावांवर ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या करू मैं मर जाऊ! कुलदीपला चेन्नई कसोटीत संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
आजवर अनेकांच्या दांड्या गुल केल्या पण आजची ‘ही’ विकेट बुमराह कधीच विसरणार नाही; वाचा कारण