सोमवार रोजी (२५ ऑक्टोबर) अफगानिस्तानचा संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीतील त्यांचा पहिलावहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. शारजाह येथे स्कॉटलँडविरुद्ध झालेल्या या सामन्यात अफगानिस्तानने १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अफगानिस्तानच्या खेळाडूंसाठी भावनात्मक रुपातून हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण देशात तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर पहिल्यांदाच अफगानिस्तानचा संघ कोणती क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी उतरला होता.
यावेळी त्यांनी सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी तालिबान्यांचा झेंडा न फडकवता अफगानिस्तानचा झेंडा फडकवत आपले देशप्रेम व्यक्त केले. यावेळी अफगानिस्तानच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. या हृदयद्रावक क्षणाने सर्वांनाच भावुक केले आहे.
इतर सामन्यांप्रमाणे अफगानिस्तान विरुद्ध तालिबान यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीही दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले गेले. यावेळी अफगानिस्तान संघानेही त्यांचे राष्ट्रगीत गायले. सोबतच अफगानिस्तानचा राष्ट्रध्वजही फडकावला. या भावनिक क्षणावेळी अफगानिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते. तो राष्ट्रगीत संपल्यानंतर आपले डोळे पुसताना कॅमेरात कैद झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
Who can hold tears! Incredibly painful to watch.
Good luck lads @AfghanAtalan1 #AFGvsSCO #ICCT20WorldCup2021 @MohammadNabi007 @rashidkhan_19 pic.twitter.com/W9dhPnDV40
— Khalid Payenda (@KhalidPayenda) October 25, 2021
I salute the courage of our cricket heroes & their dediction to our national values.They sang the national anthem & hoisted our national flag in a very clear act of definace to Pak backed Taliban terror tyrany. Talib regime has no voice of its own & has a PM with no CV and voice https://t.co/gN5MhWS4Hu
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) October 25, 2021
अफगानिस्तान संघानेही या सामन्यात शानदार प्रदर्शन केले. स्कॉटलँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अफगानिस्तानकडून नजीबुल्लाह झारदानने सर्वाधिक ५९ धावा केल्या होत्या. त्याच्याबरोबर रहमनुल्लाह गुरबाजने ४६ आणि सलामीवीर हजरतुल्लाह झझईने ४४ धावांचे योगदान दिले होते. त्यांच्या या खेळीच्या जोरावर अफगानिस्तानने स्कॉटलँडला १९१ धावांचे तगडे आव्हान दिले होते.
अफगानिस्तानच्याया आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा एकही फलंदाज ३० धावांपर्यंतही मजल मारू शकला नाही. केवळ ३ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. अफगानिस्तानकडून मुजीब उर रेहमानने सर्वाधिक ५ आणि राशिद खानने ४ विकेट्स घेत त्यांना १०.२ षटकातच ६० धावांवर रोखले. अशाप्रकारे अफगानिस्तानने १३० धावांच्या मोठ्या अंतराने हा सामना खिशात घातला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड फलंदाजी! अफगानी फलंदाजाचा सॉलिड षटकार अन् सीमारेषेपार असलेल्या फ्रीजच्या फुटल्या काचा