आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा बदल करण्यात आला आहे. आता मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार असेल. अलीकडेच बाबर आझमने (Babar Azam) मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बोर्डाने संघात बदल केला. पण मोहम्मद रिझवानला कर्णधारपद का मिळाले? या बातमीद्वारे आपण 3 कारणे जाणून घेऊया.
बाबर आझम (Babar Azam) आणि शाहीन आफ्रिदी (Shahin Afridi) यांनी पाकिस्तानी संघाचे नेतृत्व केले आहे. या 2 खेळाडूंच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला फारसे यश मिळाले नाही. पाकिस्तानच्या सध्याच्या संघावर नजर टाकली तर बाबर आझम आणि आफ्रिदीनंतर मोहम्मद रिझवान हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आता रिझवान कर्णधार म्हणून कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) हा पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. याशिवाय त्याचा रेकाॅर्डही उत्कृष्ट राहिला आहे. या कारणांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला कर्णधार म्हणून घोषित केले.
मोहम्मद रिझवानचा एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पाकिस्तानचे बहुतेक खेळाडू राष्ट्रीय संघात आहेत आणि बाहेर आहेत, पण रिझवान नियमितपणे खेळत आहे. पाकिस्तानचा कर्णधार होण्यासाठी इतर खेळाडूंच्या तुलनेत रिझवानचा अनुभव आणि फॉरमॅटमधील रेकॉर्ड चांगला आहे. या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रिझवानकडे कर्णधारपद सोपवले आहे.
रिझवानच्या टी20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी 74 एकदिवसीय आणि 102 टी20 सामने खेळले आहेत. 74 एकदिवसीय सामन्यात रिझवानने 40.15च्या सरासरीने 2,088 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 13 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत. 102 टी20 सामन्यात रिझवानने 48.72च्या सरासरीने 3,313 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 126.45 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 29 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!
“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला