ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात ३२८ धावांचे आव्हान मिळाले आहे. दरम्यान सिराजने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फाइव्ह विकेट्स हॉल म्हणजेच डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यानंतर माजी भारतीय दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
वेगवान गोलंदाज सिराज याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात १९.५ षटके गोलंदाजी करत ७३ धावांवर सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशाने ही त्याची दुसऱ्या डावातील पहिली विकेट ठरला. रोहित शर्माच्या हातून २५ धावांवर त्याने लॅब्यूशानेला बाद केले. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यांना त्याने बाद केले. अशाप्रकारे एका डावात ५ विकेट्स घेण्याची (फाइव्ह विकेट्स हॉल) खास कामगिरी त्याने केली आहे.
First Test five-wicket haul for Mohammed Siraj 👏#AUSvIND | #WTC21 pic.twitter.com/8niDOfm2Oi
— ICC (@ICC) January 18, 2021
भारतीय दिग्गजांकडून कौतुकाची थाप
यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी ट्विटरद्वारे सिराजचे कौतुक केले आहे. ‘वडीलांना गमावले, तरीही ऑस्ट्रेलियामध्ये थांबण्याची हिम्मत दाखवली. वर्षद्वेषी टीका झाली, त्याचा तिळभरही प्रभाव स्वत:वर पडू दिला नाही. पुढे कारकिर्दीतील केवळ तिसऱ्या कसोटी सामन्यात फाइव्ह विकेट्स हॉल घेण्याचा पराक्रम केला,’ या शब्दात त्यांनी सिराजची प्रशंसा केली आहे.
Lost his father. But chose to stay in Australia.
Got racially abused….but didn’t let that affect him.
Became the leader of the attack in only his third Test. And he’s taken a five-for. Love and respect for you Siraj. 👏👏 #AusvInd— Aakash Chopra (@cricketaakash) January 18, 2021
एवढेच नव्हे तर, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही सिराजची पाठ थोपटली आहे. ‘खूप अप्रतिम गोलंदाजी केलीस मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया दौरा जस-जसा पुढे जात आहे, तस-तशी तुझ्यात प्रगती होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला. पुढील कारकिर्दीसाठी तुला खूप शुभेच्छा,’ असे भोगले यांनी म्हटले आहे.
Well bowled Mohammad Siraj. Your development as this tour has progressed has been heartwarming. Wish you a long career.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 18, 2021
कसोटी मालिकेतील मोहम्मद सिराजची कामगिरी
२६ वर्षीय सिराजने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यापुढील सिडनी कसोटी सामन्यात त्याने २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते. याबरोबर ब्रिस्बेनमध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १ विकेट आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत कसोटी मालिकेत एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग तीन दिवस पाऊस पडूनही ‘त्या’ कसोटी सामन्याचा लागला होता निकाल
ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण