भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने पुन्हा एकदा मॉडेलिंगच्या क्षेत्रात पुनरामन केले आहे.
मार्च महिन्यांपासून सुरु असलेल्या मोहम्मद शमीबरोबरच्या वादाला बाजूला सारत हसीन जहानने हा निर्णय घेतला आहे.
याची माहिती स्वत: हसीन जहानने तीच्या ट्विटर अकाउंट वर फोटोशूट करतानाचा व्हीडीओ शेअर करुन दिली आहे.
https://twitter.com/HasinJahan4/status/1015637674990841858?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1015637674990841858&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fmohammed-shami-s-estranged-wife-hasin-jahan-returns-to-modelling%2Fstory-huPgpa68rT9GUnPoNJPRAP.html
मार्च महिन्यापासून मोहम्मद शमी आणि हसीन जहान यांच्यात वाद सुरु आहेत.
मोहम्मद शमीचे पाकिस्तानी मुलीशी अनैतीक संबंध, मॅच फिक्सिंग आणि शमी घरगुती हिंसाचार करत असल्याचे आरोप हसीन जहानने केले होते.
त्यानंतर मोहम्मद शमीचा करार बीसीसीआयने रोखून धरला होत. अखेर या सर्वांमधून क्लिन चिट मिळाल्यानंतर बीसीसीआयने बीसीसीआयच्या ब कॅटॅगिरीच्या करारामध्ये त्याला सामिल करुन घेतले आहे.
२०११ साली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना मॉडेल आणि चिअर लिडर असलेल्या हसीनशी मोहम्मद शमीची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांनी विवाह केला होता.
शमीशी विवाह झाल्यानंतर हसीन मॉडेलिंग क्षेत्रापासून दूर होती. मात्र आता गेल्या चार महिन्यांपासून शमीशी सुरु असलेल्या वादाला बाजूला सारत तीने हा निर्णय घेतला आहे.
ती फतवा नावाच्या चित्रपटात काम करण्याची चर्चा असून त्यात ती महिला पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.
तसेच गेली चार महिने भारतीय गोलंदाज मोहम्मद शमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.
जून महिन्यात योयो टेस्टमध्ये फेल झालेला मोहम्मद शमी नुकतात पुन्हा घेण्यात आलेल्या योयो टेस्टमध्ये पास झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एमएस धोनीने यापुर्वी असे भाष्य कधीही केले नव्हते
-अशी काय चुक झाली ज्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने माफी मागितली