भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून भारतीय खेळाडूंबद्दल अपशब्द वापरले गेले आहेत. सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना मोहम्मद सिराज व वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी अभद्र भाषा वापरली असल्याचे समोर येत आहे.
ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ असताना प्रेक्षकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. मोहम्मद सिराज व वॉशिंग्टन सुंदरबद्दल मोठ्याने आवाज देत अभद्र भाषेचा वापर केला गेला. एका रिपोर्टनुसार प्रेक्षक सिराजला, तू एक किडा आहेस अशा प्रकारचे शब्द वापरत होते.
https://twitter.com/pant_fc/status/1350012579578482690
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानही सिराजबद्दल अपशब्द वापरले गेले होते. सिराजने अंपायरकडे तक्रार केली असता पोलिसांनी टीका करणाऱ्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून दिले होते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल क्रीडाविश्वाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्णभेदाबद्दल काही कठोर नियम बनवण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्माने घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मार्नस लॅब्यूशेनने भारताविरुद्ध शतकी खेळी करत डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे, केला ‘हा’ खास रेकॉर्ड
कमाल! भुवनेश्वर कुमारनंतर ‘असा’ पराक्रम करणारा टी नटराजन दुसराच भारतीय