भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी येथे सुरु झाला आहे. मात्र पहिल्या दिवशी क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा झाली ती मोहम्मद सिराजच्या एका कृतीची. सामना सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले जाते. जेव्हा भारताचे राष्ट्रगीत गायला सुरुवात झाली तेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अभिमानाने अश्रू अनावर झाले.
सोशल मीडियावर देखील सिराजला अश्रू अनावर झाल्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून, सर्व क्रिकेट रसिकांकडून त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. सिराज हा भावनिक व्यक्ती असल्याचे मानले जाते. पहिल्या कसोटी सामन्यावेळी देखील तो राष्ट्रगीताच्या वेळी भावनिक झाल्याचे दिसले होते.
✊ #AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वडीलांचे निधन –
सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. तरीही त्याने कुटुंबापेक्षा जास्त आपल्या कर्तव्याला महत्त्व दिले आणि तो परत मायदेशी गेला नाही. त्याला याचे फळही मिळाले. त्याला या दौऱ्यात मेलबर्न कसोटीतून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.
पदार्पणाच्या सामन्यात चमकला सिराज –
पदार्पणाच्या सामन्यातच सिराजने चमकदार कामगिरी केली. त्याने मेलबर्न येथे पदार्पणाचा कसोटी सामना खेळताना पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 5 विकेट्स घेतल्या. या 5 विकेट्समध्ये मार्नस लॅब्यूशाने, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड आणि नॅथन लायन अशा खेळाडूंच्या विकेटचा समावेश होता.
दुसऱ्या कसोटीतही शानदार सुरुवात
दुसऱ्या कसोटीदरम्यान सिराजने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नरला केवळ 5 धावांवर बाद केले आहे. पावसामुळे जास्त खेळ न होता सामनामध्येच थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 7.1 षटकात 1 गडी गमावत 21 धावा केलेल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोकादायक’ डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केले जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
नवदीप सैनीने केले आपले कसोटी पदार्पण, ‘या’ दिग्गजाकडून मिळाली कॅप
ऑस्ट्रेलियाकडून २२ वर्षीय खेळाडूचे झाले कसोटी पदार्पण, पाहा कशी आहे कामगिरी