शनिवारपासून (१९ जून) भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या बहुप्रतीक्षित सामन्यात भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीनंतर लागोपाठ दोन धक्के बसले. मात्र, या सामन्यात राखीव खेळाडू असलेल्या मोहम्मद सिराजने चाहत्यांचे मन जिंकणारे एक कृत्य केले. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होऊ लागला आहे.
सामन्यात भारताची दमदार सुरूवात
दोन वर्षापासून खेळवल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना एजबॅस्टन येथे सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. न्यूझीलंडने आपल्या संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली.
भारतासाठी या सामन्यात रोहित शर्मा व प्रथमच इंग्लंडमध्ये खेळत असणाऱ्या शुबमन गिलने सुरुवात केली. दोघांनीही सावधपणे खेळत भारताला ६३ धावांची सलामी दिली. रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. त्याला कायले जेमिसनने बाद केले. त्यानंतर, गिल नील वॅग्नरचा शिकार बनला.
गिलच्या हेल्मेटवर लागला चेंडू
सलामीवीर शुबमन गिल न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जात होता. मात्र, जेमिसन टाकत असलेल्या डावाच्या १७ व्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन थेट गिलच्या हेल्मेटवर लागला.
गिलला चेंडू लागल्यानंतर या सामन्यात बाराव्या खेळाडूची भूमिका पार पडत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने जराही विलंब न लावता पाणी व टॉवेल घेऊन मैदानाकडे धाव घेतली व गिलची विचारपूस केली. गिलने आपण ठीक असल्याचे सांगितल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. चाहत्यांनी त्याच्या या साधेपणाचे सोशल मीडियावरून चांगलेच कौतुक केले.
https://twitter.com/pant_fc/status/1406207342413160453
I am a fan of Mohammad Siraj's Simplicity. Respect for Mohammad Siraj. What a player, most important he such a Incredible Human being. pic.twitter.com/pdRT0ev13X
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 19, 2021
सिराजला नाही मिळाली संधी
युवा वेगवान गोलंदाज असलेल्या मोहम्मद सिराज याला या ऐतिहासिक सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. सिराजला या अंतिम सामन्यात खेळवले जाईल अशी चर्चा सामन्यापूर्वी सुरू होती. मात्र, १०१ कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा हा जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्यासह या कसोटीमध्ये खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिला आशियाई कर्णधार
जिगरबाज भारतीय महिला! तळाच्या फलंदाजांच्या चिवट खेळीमुळे इंग्लंडविरुद्धची ऐतिहासिक कसोटी अनिर्णित
WTC Final: पुजाराने खाते उघडण्यासाठी घेतले तब्बल ३६ चेंडू, चाहत्यांनी साधली ट्रोलिंगची संधी