काल इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५८ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या भेदक माऱ्यासमोर संपुर्ण इंग्लंड संघाने सपशेल शरणागती पत्करली.
त्यानंतर आज पुन्हा या सामन्यात एक खास विक्रम झाला. तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयमसनने आज शतकी खेळी केलीय त्याची कसोटीतील ही १८वी शतकी खेळी आहे.
त्याने २२० चेंडूत १०२ धावांची खेळी करताना ११ चौकार आणि १ षटकार खेचला.
याबरोबर त्याने न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला. यापुर्वी हा विक्रम संयुक्तपणे राॅस टेलर (१७), केन विलीयमस (१७) आणि मार्टीन क्रो (१७) यांच्या नावावर होता.
न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
१८- केन विलीयमस
१७-राॅस टेलर
१७-मार्टीन क्रो
१२- जाॅन राइट
१२- ब्रेंडन मॅक्कूलम #म #मराठी #NZvENG #Cricket #legendinmaking @Maha_Sports pic.twitter.com/8yf3lQzPsi— Sharad Bodage (@SharadBodage) March 23, 2018
देशाकडून कसोटीत सर्वाधिक शतकी खेळी करण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावर आहे.
भारत- सचिन तेंडूलकर- ५१
दक्षिण आफ्रिका- जॅक कॅलीस- ४५
आॅस्ट्रेलिया- रिकी पाॅंटींग- ४१
श्रीलंका- कुमार संगकारा- ३८
विंडीज- ब्रायन लारा- ३४
पाकिस्तान- यूनीस खान- ३४
इंग्लंड- अॅलेस्टर कूक- ३२
न्यूझीलंड- केन विलीयमसन-१८
झिम्बांब्वे- अॅंडी फ्लाॅअर- १२
बांगलादेश- तमीम इक्बाल- ८