मुंबई । आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर हा आयपीएल २०१८मधील १४ वा सामना मुंबईच्या शेषराव वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई संघाला अजूनही सूर गवसलेला नसून त्यांना आज आपल्या पहिल्या विजयाची ओढ लागली आहे.
असे असले तरीही आज या संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा एक खास विक्रम करणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाबरोबर अव्वल स्थानी विराजमान होणार आहे.
रोहितने आयपीएलमध्ये १६२ सामने खेळले असून सुरेश रैनाने १६३ सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीचेही १६२ सामने झाले असून त्यांचा पुढील सामना २० एप्रिलला असल्यामूळे तुर्तास धोनीला या विक्रमासाठी वाट पहावी लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला पायाच्या पोटरीमध्ये क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात धावा करताना त्रास होत होता.त्यामुळे रैनाला पुढील दोन सामन्यांना म्हणजेच १५ एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या आणि २० एप्रिलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-
१६३- सुरेश रैना
१६२- रोहित शर्मा
१६२- एमएस धोनी
१५६- दिनेश कार्तिक
१५३- राॅबीन उथप्पा
१५२- युसूफ पठाण / गौतम गंभीर / विराट कोहली