कटक। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात आज बाराबती स्टे़डियमवर तिसरा आणि निर्णायक वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 50 षटकात 316 धावांचे आव्हान दिले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यावेळी रोहितने 9 वी धाव करताच एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्याने हा विश्वविक्रम करताना 22 वर्षांपूर्वी सनथ जयसूर्याने केलेला विक्रम मो़डला आहे.
रोहितला या सामन्याआधी एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर फलंदाज होण्यासाठी केवळ 9 धावांची आवश्यकता होती. त्याने आजच्या सामन्याआधी 2019 मध्ये सलामीला खेळताना 47 सामन्यात 52.86च्या सरासरीने 10 शतके आणि 9 अर्धशतकांसह 2379 धावा केल्या होत्या.
जयसूर्याने 1997 मध्ये 37 सामन्यात 58.21 च्या सरासरीने 6 शतके आणि 15 अर्धशतकांसह 2387 धावा केल्या होत्या.
तसेच रोहित हा एका वर्षात सलामीवीर म्हणून 10 शतके करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर –
2388 – रोहित शर्मा (2019)*
2387 – सनथ जयसुर्या (1997)
2355 – विरेंद्र सेहवाग (2008)
2349 – मॅथ्यू हेडन (2003)
2296 – सईद अन्वर (1996)
कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा
वाचा- 👉https://t.co/IOIiS2rJUw👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #ViratKohli #Forbes2019TopCeleb100— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
गोष्टी लपून रहात नाही! कोहलीचं देतो वयस्कर खेळाडूंना सर्वाधिक संधी
वाचा👉https://t.co/qg79VHYMfA👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019