24 जानेवारी रोजी ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना (1st Match of T20 Series) भारताने 6 विकेट्सने (Won by 6 Wicketes) जिंकला. तसेच या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
आता पुढील सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ हिच आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. असे असले तरी या सामन्यात विराट कोहलीला एक खास विक्रम कऱण्याची संधी आहे. विराटने या सामन्यात जर ३६ धावा केल्या तर टी२० कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू ठरले.
विराटने कर्णधार म्हणून ३४ सामन्यात ४६.८२च्या सरासरीने १०७७ धावा केल्या आहेत. यात त्याने ८ अर्धशतकेही केली आहेत.
गेल्यात सामन्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचे स्थान न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयम्सने पटकावले आहे. त्याने भारताविरुद्ध खेळताना न्यूझीलंडकडून 26 चेंडूत 51 धावा केल्या. त्यामुळे आता त्याच्या कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 40 सामन्यात 31.50 च्या सरासरीने 1134 धावा झाल्या आहेत.
यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत धोनीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. टी20 मध्ये धोनीने कर्णधार म्हणून 72 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत.
तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) असून त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1273 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
1273 – फाफ डू प्लेसिस (40 सामने)
1134 – केन विलियम्सन (40 सामने)
1112 – एमएस धोनी (72 सामने)
1077 – विराट कोहली (34 सामने)
1013 – ओएन मॉर्गन (43 सामने)