कोलंबो: आज भारताच्या अश्विनने एक खास विक्रम आपल्या नावावर कायम राखला आहे. आज अश्विनने दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी येऊन उपुल तरंगाला बाद केले. दुसऱ्या क्रमांकावर येऊन सर्वाधिक विकेट घेण्याचा हा विक्रम आता अश्विनच्या नावावर आहे.
ही कसोटी सुरु होण्यापूर्वी अश्विनने दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीला येऊन ६० विकेट्स घेतल्या होत्या तर रंगाना हेराथच्या नावावर ५६ विकेट्सचा विक्रम होता. श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करताना हेराथला दुसऱ्या क्रमांकावर पाचारण केले. भारताच्या पहिल्या डावात हेराथने विराट कोहली, आर अश्विन, वृद्धिमान सहा आणि मोहम्मद शमीची विकेट घेतली.
मोहम्मद शमीची विकेट ही भारताच्या पहिल्या डावातील शेवटची आणि हेराथची ६०वी दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीला येऊन घेतलेली विकेट होती. भारताने त्यांनतर भारताने पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला.
श्रीलंका जेव्हा फलंदाजीला आली तेव्हा कर्णधार विराट कोहलीने पाहिलं षटक हे शमीला तर दुसरे षटक अश्विनला दिले. अश्विनने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उपुल तरंगाला बाद करत ३५व्या मिनिटाला हा विक्रम पुन्हा आपल्या नावे केला.
दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीला येऊन सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
६१ आर अश्विन
६० रंगाना हेराथ
६० कॉलिन ब्लेथ