ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या (१८ जानेवारी) खेळाला सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मार्कस हॅरिस व डेव्हिड वॉर्नर या दोघांची सेट जोडी मोडून काढली. तर मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. यासह सिराजने कसोटीतील एका मोठ्या विक्रमात भारतीय दिग्गजांना मागे टाकले आहे.
२६ वर्षीय सिराजने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यापुढील सिडनी कसोटी सामन्यात त्याने २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते. याबरोबर ब्रिस्बेनमध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १ विकेट आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स अशा एकूण ६ विकेट्स त्याने आतापर्यंत घेतल्या आहेत.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत तब्बल १३ कसोटी विकेट्सची सिराजने खात्यात नोंद केली आहे. यासह ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करत मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मोठा विक्रम सिराजच्या नावावर झाला आहे.
सिराजपुर्वी माजी भारतीय गोलंदाज जवागल श्रीनाथ हे या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान होते. त्यांनी १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी पदार्पण केले होते. या कसोटी मालिकेत श्रीनाथ यांनी एकूण १० विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर ताबा मिळवला होता. परंतु आता सिराजने १० पेक्षा अधिक विकेट्स घेत श्रीनाथ यांनाही मागे टाकले आहे. सोबतच दत्तू फाडकर आणि सय्यद आबिद अली यांच्यावरही सिराज वरचढ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय-
१२ विकेट्स – मोहम्मद सिराज (२०२०-२१)
१० विकेट्स – जवागल श्रीनाथ (१९९१-९२)
८ विकेट्स – दत्तू फाडकर (१९४७-४८)
८ विकेट्स- सय्यद आबिद अली (१९६७-६८)
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रिस्बेन कसोटीतील वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ खेळीनंतरही वडील निराश, काय आहे यामागचं कारण
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल