भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा केवळ आयपीएलमध्ये खेळत असतो. 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आयपीएलशिवाय कोणतीही स्पर्धा खेळत नाही. यावर्षी आयपीएल देखील त्याच्याच नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकली. सीएसकेच्या या यशानंतर त्याचे चाहते त्याला भेटल्यानंतर त्याचे अभिनंदन तसेच या विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसतात. नुकतेच धोनीचे स्वतःचे शहर असलेल्या रांची येथे काही चाहत्यांसोबत त्याने संघाच्या याच विजयाचे केक कापून सेलिब्रेशन केले.
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनी याच्या नेतृत्वात चेन्नईने यावर्षी आयपीएल अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. रवींद्र जडेजा याने अखेरच्या दोन चेंडूवर आधी षटकार व त्यानंतर चौकार मारत संघाला विजयी केलेले. चेन्नईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. चेन्नईने हे विजेतेपद मिळवून तीन महिन्यांचा अवधी लोटला असला तरी, चाहते सातत्याने या विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसतात.
MS Dhoni celebrating CSK's 5th title in Ranchi. pic.twitter.com/nPQu22RmEZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2023
रांची येथे एका कार्यक्रमात गेला असता धोनी याला काही चाहते भेटले. या चाहत्यांनी चेन्नईच्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी खास केक आणला होता. स्वतः धोनीने या चाहत्यांसोबत ते सेलिब्रेशन करत इतरांना केक भरवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएल संपल्यानंतर धोनी याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आयपीएलच्या पुढील हंगामात तो खेळणार का याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, धोनीने यापूर्वी स्पष्ट केले आहे की आपण याबाबत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निर्णय घेऊ. आयपीएल लिलाव आधी धोनी याविषयी आपले मत सार्वजनिक करू शकतो. असे झाल्यास, ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची अखेर असेल.
(MS Dhoni celebrating CSK’s 5th title in Ranchi)
हेही वाचा-
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना