सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके बसले.
जेव्हा ७व्या षटकात हशिम अमलाला मुंबईकर शार्दल ठाकुरने एमएस धोनीकडे झेल द्यायला भाग पाडले तेव्हा धोनीचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा ६००वा झेल होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० झेल घेणारा धोनी जागतिक क्रिकेटमधील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी केवळ मार्क बाउचर (९५२) आणि अॅडम गिलख्रिस्ट (८१३) यांनी अशी कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक झेल घेणारे खेळाडू-
९५२ झेल- मार्क बाउचर (एकूण बळी- ९९८)
८१३ झेल- अॅडम गिलख्रिस्ट (एकूण बळी- ९०५)
६०० झेल- एमएस धोनी (एकूण बळी- ७७४)
५३९ झेल- कुमार संगकारा (एकूण बळी-६७८ )
MS DHONI on this tour:
3rd ODI – Completed 400 dismissals as wicket-keeper in ODI cricket
5th ODI – Completed 500 dismissals as wicket-keeper in List A cricket
6th ODI – Completed 600 catches as wicket-keeper in International cricket#SAvIND— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 16, 2018