---Advertisement---

रिअल इस्टेट फर्मवरून धोनी, हरभजन सिंगवर हल्लाबोल

---Advertisement---

अनेक क्रिकेटपटू आजकाल रिअल इस्टेट फर्मच्या जाहिराती करताना दिसतात. त्यातील काही फर्म या लोकांना दिलेली वचनं पाळण्यात कमी पडल्यामुळे या क्रिकेटपटूंना त्यासाठी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

माजी कर्णधार एमएस धोनी आणि हरभजन सिंग हे दोन क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर लोकांच्या रोषाला सामोरे जात आहे. एमएस धोनी हा अनेक गृहप्रकल्पांचा ब्रँड अम्बॅसॅडर होता. परंतु हे प्रकल्प अनेक कारणांमुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षी धोनीने या प्रकल्पासोबतचे सर्व संबंध तोडले.

या गोष्टींना बळी पडलेल्या काही लोकांनी ट्विटरवर धोनी आणि हरभजनवर जोरदार हल्लाबोल केला. त्यात एकजण म्हणतो, ” हरभजन सर आपल्याला फुकटात विला(बंगला) तर मिळाला परंतु आमचे तर पैसे बुडत आहेत. ”

यावर हरभजन सिंग ट्विटच्या माध्यमातून म्हणतो, ” भाई तुला कुणी सांगितलं मला बंगला मिळाला. ठेंगा मिळाला आहे आम्हाला. मूर्ख बनवलं आम्हाला. आमच्या नावाचा वापर करून लोकांचं नुकसान केलं. ”

त्यावर दुसरा एक ट्विट आला. ज्यात दुसरी व्यक्ती म्हणते, ” आम्रपाली प्रकल्पाचा मालक हा धोनीचा चांगला मित्र आहे. त्यामुळे हरभजन खोटं बोलू नकोस. ”

https://twitter.com/maxdoon1/status/899877272387059712

यावर भज्जी म्हणतो, “तो त्याचा असू शकतो मित्र माझा नाही. त्यामुळे तुम्ही त्याला प्रश्न विचारणं योग्य राहील जर तुला थोडंही डोकं असेल तर? ”

मीडिया रिपोर्टप्रमाणे २०११ विश्वविजेत्या भारतीय संघातील सदस्यांना ह्याच गृहप्रकल्पाने बंगले बक्षीस म्हणून दिले होते. परंतु ते आम्हाला मिळाले नाहीत असे हरभजन सिंगने नंतर सांगितली होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment