असे म्हणतात की मिशा या पुरुषांचा अभिमान असतात. १९६४ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ या चित्रपटामधील ‘मूँछ हो तो नथ्थुलाल जैसी’ हा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. पण आजच्या युगात नथ्थुलालसारख्या मिशा खूपच जुनी स्टाईल बनली आहे.
आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मिशीची स्टाईल चर्चेत आहे. अलीकडेच त्याने आपल्या आकर्षक मिश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. धोनीच नाही तर असे अनेक खेळाडू आहेत, जे नेहमीच आपल्या मिशांमुळे चर्चेत असतात. आम्ही तुम्हाला अशा सुमारे ८ खेळाडूंविषयी माहिती देणार आहोत, जे आपल्या मिशांमुळे चर्चेत आले आहेत.
एमएस धोनी
महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या खेळामुळे तसेच त्याच्या बदलत्या लुकमुळे चर्चेत असतो. ते नेहमी त्याच्या लूकवर प्रयोग करतो. अलीकडे धोनी मिशा आणि स्टायलिश दाढी घेऊन खूपच डॅशिंग दिसत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना कमांडरसारखा दिसत आहे.
शिखर धवन
भारतीय संघाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन आपल्या मिश्यांमुळे इतर सर्व खेळाडूंपेक्षा अगदी वेगळा दिसत असतो. मैदानावर लांब लांब फटके मारताना धवन बर्याचदा आपल्यावर मिशांवर ताव देताना दिसतो.
रवींद्र जडेजा
सुरुवातीच्या काळात भारतीय संघाचा अव्वल अष्टपैलू रवींद्र जडेजा क्लिन शेव ठेवत होता. पण दरम्यान फक्त मिश्यांमधील त्याचा लूक खूप प्रसिद्ध झाला होता.
डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसुद्धा त्याच्या लूकवर बरेच प्रयोग करत असतो. तो बऱ्याचदा मिशांच्या लूकमध्ये दिसला आहे. ज्यामध्ये तो भारतीय वंशाचा वाटतो.
कपिल देव
भारताचा दिग्गज खेळाडू आणि प्रथम विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार कपिल देव देखील नेहमीच दाट मिश्यांमध्ये दिसले आहेत. त्यांची ही स्टाईल त्यांना आजही सर्वांपेक्षा वेगळे करते.
मर्व ह्यूजेस
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मर्व ह्युजेसची मिशी क्रिकेट क्षेत्रात प्रसिद्ध राहिली आहे. म्हणूनच मर्व्हने आपल्या मिशीचा विमा काढला होता. तो आपल्या सायकल हँडलसारख्या आकारच्या मिशांमुळे आणि लांबलचक शरीरामुळे नेहमीच चर्चेत असतो.
डेव्हिड बून
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि पंच डेव्हिड बून आपल्या मोठ्या मिशांसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यांना त्यांच्या ‘हँडलबार’ मिशा इतक्या आवडतात, जितके त्यांना त्यांच्या क्रिकेट आवडते.
ग्राहम गूच
ग्रॅहम गूच इंग्लंडचा माजी फलंदाज आहे. त्याच्या जड आणि दमदार मिश्यांमुळेही त्याची सदैव आठवण काढली जाते.
महत्वाच्या बातम्या
रोहित शर्माकडे विराट कोहली सोपवणार कर्णधारपदाची जबाबदारी? माजी दिग्गजाची भविष्यवाणी होणार खरी?
WTC फायनल: तीन वर्षांनंतर पुन्हा भारतीय फलंदाजांच्या नावे झाला ‘तो’ लाजीरवाणा विक्रम
WTC फायनलमध्ये न्यूझीलंडचा गाजावाजा! कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा