भारताचा कॅप्टन कूल एमएस धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या सर्वात मोठ्या फॅनला म्हणजेच सुधीर कुमार गौतमला घरी आमंत्रित केले होते.
या आमंत्रणानुसार गौतम धोनीच्या घरीही गेला होता. गौतमने धोनीच्या घरी गेलेल्याचे फोटो 1 जूनला त्याच्या ट्विटर आकांउटवरुन शेअरदेखील केले आहेत.
यात त्याने धोनी कुटुंबासमवेत जेवण करतानाचा तसेच धोनी आणि त्याचे वडील पानसिंग यांच्यासोबतचाही फोटो शेअर केला आहे.
या फोटोंबरोबरच त्याने कॅप्शन दिले आहे की ” कॅप्टन कूल एमएस धोनी बरोबरचा विशेष दिवस होता.” तसेच पुढे त्याने म्हटले आहे की “सुपर कुटुंबाबरोबर सुपर जेवण. या क्षणाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. धन्यवाद धोनी आणि साक्षी दी.”
https://twitter.com/Sudhir10dulkar/status/1002512187493998593
याबरोबरच गौतमने असेही सांगितले की चेन्नईने आयपीएल 2018चे विजेतेपद जिंकल्यानंतर धोनी सध्या आराम करत आहे.
धोनी सध्या सामने नसल्याने रांचीत त्याच्या घरी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली नुकतेच चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2018चे विजेतेपद मिळवले आहे.