अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करताना भारताला एकजूट राहण्याचा सल्ला दिला. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या क्रिकेटपटूंना शेतकरीविरोधी म्हटले जात आहे. दुसरीकडे संदीप शर्मा, इरफान पठाण यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली दिसते. या सर्वात मात्र, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी काहीही न बोलल्यामुळे ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
धोनी होतोय ट्रेंड
भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी बुधवारी (३ फेब्रुवारी) रात्री सलगपणे ट्विट करत ‘इंडिया टुगेदर’ हा हॅशटॅग ट्रेंड केला. ज्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होणार का ? अशी सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र, धोनीने या विषयावर गप्प राहणे पसंत केले. त्यामुळे अचानकपणे त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली.
सर्व भारतीय क्रिकेटपटू रोषाला सामोरे जात असताना धोनीच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. एका ट्विटर हँडलवरून ट्विट केले गेले की, ‘इतर: धोनी टॅगसोबत ट्विट करणार का ?’ त्यावर धोनीचे ‘डेफिनेटली नॉट’ असे बोलतानाचे छायाचित्र शेअर केले गेले आहे.
Others – #Dhoni Will Tweat With Tag @msdhoni ~ Definitely Not 😌 pic.twitter.com/TNVGvC3RyM
— ⚒️🛠️ Sridhar Sri 🛠️⚒️ (@sridhar_sri__) February 4, 2021
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहीले, सर्वजण बाद झाले, मात्र नेहमीप्रमाणे धोनी नाबाद आहे.
All wickets Gone …
Asusual a #Notout Batsmen in Crease 🕺❣
Proud #Msdian 😘#Dhoni pic.twitter.com/KAQ916oAKR
— SATHYADEV AK 🔥 (@salukukty) February 4, 2021
अन्य एका चाहत्याने धोनी व राहुल द्रविड यांचे छायाचित्र शेअर करत, ‘जेंटलमॅन ऑफ द गेम’ असे म्हटले आहे.
https://twitter.com/msdhonizealot/status/1357178043123466244
https://twitter.com/ImDeadu/status/1357355458411991043
#Dhoni pic.twitter.com/yeBGfnD9zP
— ⇝ Arun Kumar ⇜ (@Iam_A6un) February 4, 2021
He doesn't need a reason to trend at all 😎 @msdhoni | #MSDhoni | #Dhoni pic.twitter.com/nYYXKXXlNt
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) February 4, 2021
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय शेतकरी आंदोलनाचा मुद्दा
जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. हा भारताचा अंतर्गत प्रश्न असुन त्यात भारताबाहेरील लोकांनी बोलू नये, असे अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडली; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली माहिती
इंग्लंडविरुद्ध दोन विजय अन् टीम इंडिया रचणार २१ व्या शतकातील ‘हा’ मोठा विक्रम
‘तू शेतकऱ्यांचा नायक आहेस’, क्रिकेटपटू संदीप शर्माचे होतेय कौतुक; ‘हे’ आहे कारण