आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने रांचीतील तमर दुर्गा देवरी मंदिराला भेट दिली. चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकल्याने मातेचे धन्यवाद करण्यासाठी तो तेथे आला होता.
दोन वर्षांच्या बंदीनंतर पुर्नरागमन करून विजेतेपद मिळवणे ही खूप विशेष बाब आहे.
या आयपीएल मध्ये धोनीने कर्णधार आणि विकेटकीपर बरोबरच उत्कृष्ठ फलंदाजाची भुमिका सुध्दा पार पाडली. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने कधीही 25च्या वर षटकार नाही मारले.
मात्र या मोसमात त्याने 30 षटकार ठोकले. त्याच बरोबर 75.83च्या सरासरीने 455 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 150.66 एवढा प्रचंड होता.
शिखर धवनने याआधीच सांगितले होते की, 2019च्या विश्वचषकासाठी धोनीचा फॉर्म चांगला असणे जरूरी आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सुध्दा धोनीचा फॉर्म बघून आनंदीत आहे.
सध्या विश्रांती घेत असलेला धोनी या महिन्याच्या शेवटी आर्यलंड विरूध्दच्या टी-20 सामन्यात संघात सामील होणार आहे. तसेच जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंडच्या दौऱ्यात वन-डे आणि टी-20 सामन्यांतही तो संघाचा भाग असणार आहे.