---Advertisement---

पंतची बॅटींग बघायला त्याचा ‘जगप्रसिद्ध’ फॅन थेट इंग्लंडमध्ये पोहोचला, नाव ऐकूण धक्का बसेल

Ms-Dhoni-Mask-Rishabh-Pant
---Advertisement---

भारताने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताने इंग्लंडचा २-०ने धुव्वा उडवला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजयी आघआडी घेतली. मात्र, या सर्व गोष्टींशिवाय आणखी एका व्यक्तीने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. 

धोनी दुसऱ्या टी२० सामना पाहायला आला तेव्हा त्याने एकदम हटके अंदाजात एन्ट्री केली. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो रिषभ पंतचा मुखवटा घालून उभा आहे. खरंतर धोनीने स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी एक खास युक्ती अवलंबली होती. त्याच्या फॅन्डमपासून वाचण्यासाठी तो पंतच्या मास्कमध्ये स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होता.

मात्र, काही चाहत्यांनी त्याला ओळखले आणि फोटोसाठी पोज देताना दिसले. एजबॅस्टन येथे टी२० पाहिल्यानंतर धोनीने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. बीसीसीआयने धोनीचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्याने रिषभ पंत आणि ईशान किशन यांच्याशी खूप संवाद साधला.

किशन गेल्या काही डावांपासून संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत धोनीने त्याला टिप्स दिल्या. धोनी किशनला समजावत असताना पंत बाकीच्या खेळाडूंसोबत मस्ती करत होता. या सामन्यादरम्यान धोनी पंतलाही भेटला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत पंत अपयशी ठरला होता. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर तो लयीत असल्याचे दिसत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

शेवटच्या टी-२० सामन्यात कुठे बिघडला भारताचा डाव, कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण

INDvENG। पाचव्या कसोटीनंतर जॉनीला स्पेशल गिफ्ट! आयसीसीने दिलाय विशेष सन्मान

श्रीलंकेला लागला मोठा झटका, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू मालिकेबाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---