चेन्नई। आज आयपीएल2019 मध्ये 44 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. एमए चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला चेन्नईचा नियमित कर्णधार एमएस धोनी मुकणार आहे.
त्याला ताप आल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. याआधीही हैद्राबादला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. या सामन्यात सुरेश रैनाने चेन्नईचे नेतृत्व केले होते.
त्यामुळे आजच्या सामन्यातही रैनाच चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनी याआधी चेन्नई सुपर किंग्सचे केवळ 4 आयपीएल सामने मुकला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अंतिम 11 जणांच्या संघात न खेळण्याची धोनीची ही केवळ पाचवी वेळ आहे.
धोनीबरोबरच रविंद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसही आजच्या सामन्याला मुकणार आहेत. त्यांच्याऐवजी चेन्नईकडून अंतिम 11 जणांच्या संघात ध्रुव शोरे, मुरली विजय आणि मिशेल सँटेनरला संधी देण्यात आली आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकूून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी ऐवजी अंबाती रायडू चेन्नई संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
#Thala missing out a game for the second time this season, this time due to fever! 😢
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 26, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–हार्दिक पंड्या पाठोपाठ १७ वर्षीय रियान परागनेही मारला हॅलिकॉप्टर शॉट, पहा व्हिडिओ
–१९ वर्षांपूर्वी वडीलांना तर आता मुलाला यष्टीरक्षक धोनीने केले बाद
–राजस्थानसाठी विजयी खेळी करणारा रियान पराग झाला असा बाद की कर्णधारही झाला चकीत, पहा व्हिडिओ