बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात रंगला. एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हेलीने तिच्या नावावर क्रिकेटविश्वातील मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये यष्टीमागे बळींचे शतक पूर्ण करणारी (wicketkeeper to register 100 dismissals in t20i cricket) एलिसा हेली (Alyssa Healy) ही जगातील पहिलीच क्रिकेटपटू बनली आहे. हा विक्रम करताना तिने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला मागे टाकले आहे. धोनीने टी२० क्रिकेटमध्ये ९८ सामन्यात ९१ बळी घेतले आहेत. यामध्ये ५७ झेल आणि ३४ स्टम्पिंगचा समावेश आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात हेलीने स्म्रीती मंधानाचा झेल घेताच ती पुरूष किंवा महिला क्रिकेटमध्ये यष्टीमागे १०० बळी घेणारी पहिली खेळाडू ठरली आहे. ३२ वर्षीय हेलीचा हा १२८वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे. तिने या सामन्यात शेफालीचाही झेल घेतला आहे. यामुळे तिचे यष्टीमागे एकूण १०१ बळी झाले आहेत. २०१०मध्ये टी२०मध्ये पदार्पण करताना तिने आतापर्यंत ४७ झेल घेतले असून ५४ स्टम्पिंग केले आहेत.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र स्म्रीती २४ धावा करत बाद झाली. नंतर शेफालीने यष्टीरक्षक यस्तिका भाटियाच्या साथीने सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला. शेफालीने ४८ धावा केल्या. तर हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तिने ५२ धावा केल्याने भारताने १५०चा आकडा पार केला. भारताने २० षटकात ८ विकेट्स गमावत १५४ धावासंख्या उभारली. हा सामना भारताने ३ विकेट्सने गमावला.
टी२०मध्ये यष्टीमागे सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
१०१ एलिसा हेली
९१ एमएस धोनी
७४ सारा टेलर
७३ क्विंटन डि कॉक
७२ रहेल प्रीस्ट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शर्माजी पुन्हा टी२०तील ‘टॉपर’, वेस्ट इंडिजविरुद्ध ताबडतोब अर्धशतक करत विश्वविक्रम नावावर
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
भारतीय दिग्गजाने साथ सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका, आयपीएल आहे कारणीभूत?