भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) 15 वर्षांपूर्वी (15 Years Ago Debut) आजच्याच दिवशी (23 डिसेंबर, 2004) वनडे क्रिकेटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याने बांगलादेश विरुद्ध पदार्पण केले होते.
याच निमित्ताने आज धोनीचा एक खास व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ आयपीएल मोसमादरम्यानचा जयपूर येथील आहे.
या व्हिडिओत दिसते की धोनी बसमधून खाली उतरला आहे. तसेच, त्याच्या आजूबाजूला खूप सारे चाहते आहेत. सर्व चाहते धोनीला पाहून खूप खूश झालेले दिसत आहेत. तसेच त्याला ‘माही सर, माही सर’ असेही पुकारत आहेत.
धोनी बसमधून खाली उतरल्यानंतर, तो एका चाहत्याकडून त्याचे रेखाटन केलेले पोस्टर घेऊन यायला सांगतो आणि त्याने त्या पोस्टरवर स्वाक्षरीदेखील केलेली पहायला मिळते. अशा प्रकारे धोनीने त्या चाहत्याचा क्षण अविस्मरणीय केला.
या व्हिडिओला चेन्नई सुपर किंग्सने ‘हा आमचा सुपर बॉन्ड असून त्याचे चाहते सर्व ठिकाणी पहायला मिळतात,’ अशा अर्थाचे कॅप्शन दिले आहे.
It's Bond, Super Bond for this 007 with his superfans everywhere he goes! This was at Jaipur right after the incredible #yellove win! #15YearsOfDhoni #WhistlePodu @msdhoni 🦁💛 pic.twitter.com/PUO2hYmykr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2019
धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतो. तसेच त्याने चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएल मोसमात त्यांचे नेतृत्वही केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
धोनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने प्रत्येकी 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा वनडे विश्वचषक, 2007चा टी20 विश्वचषक 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विजेतीपदे मिळवली आहेत. आयसीसीची तीन मोठी विजेतीपदे मिळवणारा तो एकमेव कर्णधार आहे.
शार्दुल ठाकूरने फलंदाजी करताना वापरली ही खास युक्ती
वाचा- 👉https://t.co/o8zM8OfBPq👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI
— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019
भारताचे ४ असे गोलंदाज, ज्यांनी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते
वाचा👉https://t.co/is50gOoDi1👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 23, 2019