पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापुर, नवी मुंबई, सोलापुर, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, नांदेड येथून 6क्लबमधून 50हून अधिक खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा दि.23 ते 25 मार्च2018या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे होणार आहे.
राज्यस्तरीय आंतरक्लब स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणारा आणि गतविजेत्या पीवायसी संघाला यावेळेही विजयासाठी पसंती देण्यात येत आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेविषयीचा 30वर्षावरील आणि वरिष्ठ सहभागी खेळाडूंमधील स्पर्धात्मक वाढता प्रतिसाद पाहून आम्हांला खूप आनंद होत आहे. तसेच, राज्यात टेनिस खेळाच्या प्रचारासाठी आम्ही नक्कीच मदत करू, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
राज्यातील शहरांमध्ये होणार्या या साखळी स्पर्धेत 1500हून अधिक खेळाडू हे राज्यांतील 150टेनिस क्लबचे नेतृत्व करतात. स्पर्धेतील विजेत्या संघाला 75हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच, उपविजेत्या संघाला 50 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय तिसर्या क‘मांक पटकावणार्या संघाला 25हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अय्यर यांनी नमुद केले.
राज्य स्तरावरील अंतिम फेरीत पुणे विभागातील विजेते पीवायसी अ व उपविजेते पीवायसी क यांच्यासह मुंबई विभागातील विजेते मुंबई क्रिकेट असोसिएशन व उपविजेते सीसीआय क्लब आणि संयुक्त जिल्हा संघांमधील दोन संघ यांचा समावेश आहे. या दोन जिल्हा संघाची निवड कोल्हापुर येथे पार पडलेल्या जिल्हा निवड स्पर्धेतून करण्यात आली आली होती.
स्पर्धेत राज्यातून 6विभागातील संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून साखळी पध्दतीने खेळविण्यात येणार आहे. यातील 2 गटांतील अव्वल संघ अंतिम फेरीत झुंजणार आहेत. शरद कन्नमवार हे या स्पर्धेचे स्पर्धा संचालक आहेत.
अ गटः पीवायसी अ, सीसीआय आणि संयुक्त जिल्हा ब विभागातील संघ
ब गटः एमसीए(मुंबई), पीवायसी क आणि संयुक्त जिल्हा अ विभागातील संघ