रणजी ट्रॉफीमध्ये सहाव्या फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश संघात पार पडलेला सामना आज(22 जानेवारी) अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईकडून सर्फराज खानने त्रिशतकी खेळी केली आहे. त्याने या सामन्यात मुंबईकडून पहिल्या डावात 391 चेंडूत 30 चौकार आणि 8 षटकारांसह 76.98 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 301 धावांची खेळी केली.
त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच त्रिशतक आहे. विशेष म्हणजे याआधी कधीही त्याने प्रथम श्रेणीमध्ये द्विशतकी खेळीही केली नव्हती. तो रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक करणारा मुंबईचा 8 वा फलंदाजही ठरला आहे.
रणजी ट्राॅफी स्पर्धेत मुंबईकडून त्रिशतक करणारे खेळाडू
३७७- संजय मांजरेकर, १९९१
३५९*- विजय मर्चंट, १९४३
३४०- सुनिल गावसकर, १९८२
३२३- अजित वाडेकर, १९६७
३१४*- वसिम जाफर, १९९६
३०९*- रोहित शर्मा, २००९
३०१- वसिम जाफर, २००९
३००*- सर्फराज खान, आज#RanjiTrophy #म #मराठी— Sharad Bodage (@SharadBodage) January 22, 2020
सर्फराजच्या त्रिशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने या सामन्यात आज शेवटच्या दिवसाखेर 7 बाद 688 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात 63 धावांची आघाडी घेतली. मुंबईकडून सर्फराज व्यतिरिक्त सिद्धेश लाड आणि कर्णधार आदित्य तरेने चांगला खेळ केला. पण या दोघांचेही शतक अनुक्रमे केवळ 2 आणि 3 धावांनी हुकले. लाड 98 आणि तरे 97 धावांवर बाद झाला.
तत्पूर्वी या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने पहिला डाव 8 बाद 625 धावांवर घोषित केला होता. उत्तर प्रदेशकडून यष्टीरक्षक फलंदाज उपेंद्र यादवने द्विशतकी खेळी करताना नाबाद 203 धावा केल्या होत्या. तर अक्षदीप नाथने 115 धावांची शतकी खेळी केली होती.
मात्र त्यानंतर मुंबईकडून सर्फराज खानने त्रिशतक करताना उत्तरप्रदेशला या सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही.
विशेष म्हणजे 2015 आणि 2016 चा रणजी मोसम सर्फराज उत्तर प्रदेश संघाकडून खेळला होता. यामध्ये त्याने 2015च्या मोसमात उत्तर प्रदेशकडून मुंबई विरुद्ध सामना खेळला होता.
फिटनेस नसल्याने विराट कोहलीने केले होते संघातून बाहेर –
सर्फराज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला आहे. 2016 च्या आयपीएल मोसमावेळीही तो बेंगलोर संघाचा भाग होता. त्यावेळी त्याने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 10 चेंडूत 35 धावांची आक्रमक खेळी केली होती. मात्र त्यानंरही त्याला बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने पुढील 3 सामन्यांसाठी संघातून बाहेर काढले होते. या निर्णयामागे विराटने सर्फराजच्या मैदानावरील फिटनेसचे कारण सांगितले होते.
संपुर्ण वेळापत्रक: असा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंड दौराhttps://t.co/HkqJLvy4pz
— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
दोन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे असे अनोखे बर्थडे सेलिब्रेशन पाहिले आहे का?
वाचा👉https://t.co/IY1cNyzhW7👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020