---Advertisement---

Mi vs PBKS: मुंबई-पंजाब सामना अखेर सुरू! जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना?

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील आज मुंबई विरुद्ध पंजाब संघांमध्ये दुसरा क्वालिफायर सामना पावसानंतर सुरू होत आहे. या सामन्यानंतर दुसरा फायनलिस्ट संघ मिळणार आहे. आयपीएल 2025 च्या प्लेऑफमधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई विरूद्ध पंजाब (mumbai indians vs punjab kings) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यातील विजेता संघ आरसीबीविरूद्ध 3 जूनला अंतिम सामना खेळेल.

पंजाब किंग्सचा (punjab kings) कर्णधार श्रेयस अय्यरने (shreyas iyer) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तसेच मुंबई इंडियन्सला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पण पावसाच्या कारणाने हा सामना सुरू होण्यास वेळ लागला आणि खेळाच्या नियमांनुसार अतिरिक्त 120 मिनिटांच्या वेळेनुसार सामना सुरू झालेला आहे. तसेच जरी सामना उशिरा सुरू झाला असला तरीही पूर्ण सामना 20 षटकांचा होणार आहे.

जर सामना रद्द झाला असता तर, याचा मुंबईला खूप मोठा झटका बसला असता आणि लीग स्टेजमधे मध्ये जास्त पॉईंट असल्याकारणाने पंजाब किंग्स संघ अंतिम सामन्यात पोहोचला असता. परंतु सध्या सामना सुरू झालेला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---