मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये आज डबल हेडर मधील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. हा सामना आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठा आणि तगडा सामना आहे. ज्यामध्ये गुरु- शिष्य म्हणजेच कर्णधार एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या समोरासमोर असणार आहेत. चला तर जाणून घ्या की वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कशी असणार आहे आणि येथील आयपीएल रेकॉर्ड कस आहे.
या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांनी एकमेकांविरुद्ध खेळून या हंगामाची सुरुवात केली होती. त्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली होती, त्यानंतर संघाने पाच वेळा पराभव पत्करला पण आता धोनीच्या नेतृत्वाखाली संघ सावरत आहे. मागच्या सामन्यात संघाने विजय प्राप्त केला आहे. आता सात मधील दोन सामन्यात विजय मिळवून चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स संघाची अवस्था देखील तितकी बरी नाही, पण चेन्नईपेक्षा चांगली आहे. त्यांनी 7 सामान्यांमधील 3 सामने जिंकले आहेत. तसेच हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.
पहिल्या हंगामापासून वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स संघाचे घरेलू मैदान आहे. इथे आतापर्यंत 119 सामने खेळले गेले आहेत, यामध्ये 55 वेळा तो संघ जिंकला आहे ज्याने प्रथम फलंदाजी केली आहे. तसेच धावांचा पाठलाग करणारा संघ 64 वेळा विजयी झाला आहे. तसेच टॉस जिंकणारा संघ 62 वेळा तर टॉस हारणारा संघ 57 वेळा विजयी झाला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू शकते. या स्टेडियमचा इतिहास मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जातो. पण आज परिस्थिती वेगळी पाहायला मिळू शकते. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना मदत मिळण्याची जास्त शक्यता आहे. दोन्ही संघ जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतील.