रविवारी (४ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा १७वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात २०८ धावा केल्या. मुंबईच्या या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ १७४ धावाच करु शकला आणि मुंबईने ३४ धावांनी सामना जिंकला.
हैदराबादकडून फलंदाजी करताना कर्णधार डेविड वॉर्नरने सर्वाधिक ६० धावा केल्या. ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारत त्याने ही धावसंख्या गाठली. तर मनिष पांडेने १९ चेंडूत ३० धावा आणि जॉनी बेयरस्टोने १५ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. पण इतर कोणतेही फलंदाज २०पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत. त्यामुळे हैदराबाद संघ मुंबईच्या हातून पराभूत झाला.
मुंबईकडून गोलंदाजी करताना एक-दोन नव्हे तर तीन फलंदाजांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिसन आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी हा पराक्रम केला. तर क्रुणाल पंड्यानेही हैदराबादचा युवा फलंदाज प्रियम गर्गला बाद केले.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत ६७ धावा केल्या. तर इशान किशन (३१ धावा), हार्दिक पंड्या (२८ धावा), सूर्यकुमार यादव (२७ धावा), कायरन पोलार्ड (२५ धावा) आणि क्रुणाल पंड्या (२० धावा) यांनीही डोंगराएवढा स्कोर उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पण दुखापतीमुळे सामन्याबाहेर असणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या जागी खेळणाऱ्या कौलने अतिशय महागडी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात तब्बल ६४ धावा दिल्या. तर राशिद खाननेही डी कॉकची महत्त्वाची विकेट चटकावली होती.
मुंबईने सामना जिंकून पुन्हा एकदा पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यात त्यांना ३ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबरोबर ते ६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर
महत्त्वाच्या बातम्या-
व्याजासकट वसूल..! थेट कर्णधाराला तंबूत धाडलं; कदाचित मॅच पण इथेच जिंकली??
व्वा रे पठ्ठ्या तू तर कमालंच केली, अंतिम षटकाच्या ४ चेंडूंवर २० धावा ठोकल्या
ट्रेंडिंग लेख-
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे