श्रमिक जिमखानाच्या मैदानावर सुरू असलेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत आजपासून बादफेरीच्या सामन्याचा थरार बघायला मिळणार आहे. महिला गटात चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. तर पुरुष विभागात २ उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने व ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत.
महिला गटात डॉ शिरोडकर स्पो समोर बलाढय महात्मा गांधी स्पो संघाचे आव्हान असणार आहे. तर तुल्यबल राजमाता जिजाऊ पुणे संघा विरुद्ध स्वराज्य स्पो ला दोन हात करावे लागणार आहेत. सायली केरीपले, स्नेहल शिंदे, नेहा घाडगे, अंकिता जगताप अश्या अनुभवी खेळाडू राजमाता जिजाऊ संघात आहेत.
शिवशक्ती विरुद्ध शिवतेज यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल, शिवशक्ती संघात भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व केलेल्या सोनाली शिंगटे, रक्षा नारकर या खेळताना दिसतील. तर स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत बादफेरीत प्रवेश केलेल्या कोल्हापूरच्या जय हनुमान बाचणी संघा समोर सुवर्णयुग संघाचे आव्हान असणार आहे.
पुरुष विभागात महिंद्रा, न्यु इंडिया इन्शुरन्स, एयर इंडिया, मुंबई बंदर, देना बँक, मध्य रेल्वे या संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर मुंबई पोलीस, बीईजी पुणे, युनियन बँक, जे.जे. हॉस्पिटल या चार संघाना उपउपांत्यपूर्व सामने खेळायचं आहेत. पुरुष विभागात चांगले चुरशीच्या लढती बघायला मिळतील.
महिला विभाग
उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) महात्मा गांधी स्पो. विरुद्ध डॉ. शिरोडकर
२) राजमाता जिजाऊ विरुद्ध स्वराज्य स्पो
३) शिवशक्ती महिला संघ विरुद्ध शिवतेज
४) जय हनुमान, बाचणी विरुद्ध सुवर्ण युग
पुरुष विभाग
उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने
सामना क्र. १) जे. जे. हॉस्पिटल विरुद्ध मुंबई पोलीस
सामना क्र. २) युनियन बँक विरुद्ध बी. ई. जी.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध सामना क्र. १ विजयी
२) एयर इंडिया विरुद्ध देना बँक
३) मुंबई बंदर विरुद्ध सामना क्र. २ विजयी
४) मध्य रेल्वे विरुद्ध न्यु इंडिया इन्शुरन्स