देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 50 षटकांची विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेच्या एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या माजी खेळाडूनं शानदार फलंदाजी केली. त्यानं एका षटकाच्या 6 चेंडूत सलग 6 चौकार मारण्याचा अद्भुत पराक्रम केला.
सध्या विजय हजारे ट्रॉफीचे प्री-क्वार्टर फायनल सामने खेळले जात आहेत. 9 जानेवारी (गुरुवार) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये तामिळनाडूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसननं चमत्कार केला. त्यानं स्फोटक फलंदाजी करत एका षटकात सलग 6 चौकार मारले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग राहिलेल्या जगदीसननं राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्यानं डावाच्या दुसऱ्या षटकात सलग सहा चौकार मारले.
राजस्थानला प्रथम 267 धावांवर रोखल्यानंतर तामिळनाडूचा संघ फलंदाजीसाठी उतरला. एन जगदीसन आणि तुषार राहेजा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज अमन सिंग शेखावतनं जगदीसनविरुद्ध डावातील दुसरा षटक टाकला. त्यानं पहिलाच चेंडू वाईड टाकला जो चौकार गेला. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त 5 धावा झाल्यानंतर जगदीसननं षटकाच्या सहा चेंडूवर सलग 6 चौकार मारले. अशाप्रकारे या षटकात एकूण 29 धावा झाल्या.
4⃣wd,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣,4⃣
29-run over! 😮
N Jagadeesan smashed 6⃣ fours off 6⃣ balls in the second over to provide a blistering start for Tamil Nadu 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/pSVoNE63b2 pic.twitter.com/JzXIAUaoJt— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 9, 2025
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. त्यांचा संपूर्ण डाव 47.3 षटकांत 267 धावांवर आटोपला. संघासाठी सलामीवीर फलंदाज अभिजीत तोमरनं 111 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार महिपाल लोमरोरनं 60 धावा केल्या. प्रत्युत्तरात, तामिळनाडूनं बातमी लिहिपर्यंत 30 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत. एन जगदीसन 52 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार लगावले.
हेही वाचा –
भारताच्या या वरिष्ठ खेळाडूची कारकीर्द धोक्यात! वनडे-कसोटी दोन्हीमधून बाहेर होण्याची शक्यता
फिरकीपटू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणार! रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव, कोणाला संधी मिळणार?
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारतीय कर्णधारानं घेतलं साईबाबांचं दर्शन