इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू नासिर हुसैन यांनी गेल्या 30 वर्षांतील जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम इलेव्हनची निवड केली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, यामध्ये त्यांनी केवळ एका भारतीयाचा समावेश केला.
नासिर हुसैन यांच्या सर्वोत्तम इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 5 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे 3 आणि वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि भारताचे प्रत्येकी 1 खेळाडू आहेत. विशेष म्हणजे, नासिर हुसैन यांच्या संघात त्यांच्याच देशाच्या म्हणजे इंग्लंडच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.
नासिर हुसैन यांनी आपल्या सर्वोत्तम इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथला सलामीवीर म्हणून स्थान दिलं. त्यांनी स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर रिकी पाँटिंग हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हुसैन यांच्या टीममध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळालंय. तो या संघातील एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराही या संघात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला.
नासिर हुसैन यांनी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिसचा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या संघात समावेश केला. त्याचबरोबर त्यांनी यष्टिरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टची निवड केली. हुसैन यांनी वेगवान गोलंदाजीत पाकिस्तानचा वसीम अक्रम, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राला स्थान दिलं. त्याचबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नची फिरकीपटू म्हणून निवड केली.
नासिर हुसैन यांची सर्वोत्तम एलेव्हन – मॅथ्यू हेडन, ग्रॅमी स्मिथ, रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, जॅक कॅलिस, ॲडम गिलख्रिस्ट, वसीम अक्रम, शेन वॉर्न, डेल स्टेन, ग्लेन मॅकग्रा
हेही वाचा –
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!
युवराज सिंगला त्याच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत कोणाला पाहायचं आहे? दिग्गज क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा