भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानाचे काही वेगळेच नाते आहे. गांगुलीच्या या मैदानाशी अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
त्यातील एक म्हणजे 20-24 जून 1996 दरम्यानच्या कसोटी सामन्यातून त्याचे कसोटी पदार्पण आणि या पदार्पणाच्या सामन्यातील दमदार शतक.
तसेच त्याची दुसरी आठवण म्हणजे 13 जुलै 2002 ला इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या नॅटवेस्ट वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतरचे जर्सी काढून केलेले सेलिब्रेशन.
गांगुलीच्या जर्सी काढून केलेल्या त्या सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली होती. याच सेलिब्रेशनची आठवण इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने गांगुलीला करुन दिली आहे.
झाले असे की गांगुलीने सोमवारी त्याचा लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभा राहिलेला फोटो ट्विटरवर शेअर केला. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की ‘पुन्हा एकदा लॉर्ड्सवर, जिथून कारकिर्दीची सुरुवात झाली होती.’
Back at lords ..this is where career started .. pic.twitter.com/JXi8ykxuNV
— Sourav Ganguly (@SGanguly99) July 9, 2018
त्याच्या या ट्विटवर कमेंट करताना हुसेनने म्हटले आहे की, “तू पून्हा एकदा त्या बाल्कनीत. तूला शर्ट घालून तिथे बघताना चांगले वाटले.”
You’re on that balcony again … nice to see you with your shirt on !!
— Nasser Hussain (@nassercricket) July 9, 2018
तो आठवणीतील सामना:
गांगुलीने ज्या सामन्यानंतर हे जर्सी काढून सेलिब्रेशन केले होते, त्या सामन्यात हुसेनने शतक झळकावले होते.
या सामन्यात भारताने इंग्लंडने दिलेले 326 धावांचे लक्ष यशस्वीपणे पार करत नॅटवेस्ट वनडे मालिकेचे विजेतेपद मिळवले होते. तसेच गांगुलीने या सामन्यात 43 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. तर सेहवाग बरोबर 106 धावांची सलामी भागिदारीही रचली होती.
भारताच्या या विजयात युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या 6 व्या विकेटसाठी केलेल्या 121 धावांच्या भागिदारीने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
-लिटिल मास्टर गावस्करांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!
-मास्टर ब्लास्टकडून लिटल मास्टरचे अभिष्टचिंतन
-फेडरर म्हणतो, भाऊ आधी विंबल्डन फायनल; फिफा फायनलच नंतर बघू